BAR26B12928
बार्शी : भगवंत मैदान येथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाची मानवंदना स्वीकारताना तहसीलदार एफ. आर. शेख व इतर मान्यवर.
बार्शीत संचलन पाहण्यासाठी भगवंत मैदानावर गर्दी
बार्शी शहर : बार्शी शहरात सर्वत्र प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नगरपरिषद, तहसील कार्यालय, पोलिस उपअधीक्षक कार्यालय आणि बाजार समितीसह भगवंत मैदानावर शासकीय झेंडावंदन करण्यात आले.
नगरपरिषदेत नूतन नगराध्यक्षा तेजस्विनी कथले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, नगरसेवक भारत पवार, संतोष बारंगुळे, नगरसेविका विद्या बंगाळे, सरस्वती भानवसे, सायरा मुल्ला, कर अधिकारी विठ्ठल पाटोळे, मिळकत कर अधिकारी महादेव बोकेफोडे उपस्थित होते.
पोलिस उपअधीक्षक कार्यालयात उप अधीक्षक अशोक सायकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी सर्व पोलिस कर्मचारी उपस्थित होते. भगवंत मैदान येथे शासकीय ध्वजवंदन तहसीलदार एफ. आर. शेख यांनी केले. यावेळी नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, प्रशांत कथले, उपनगराध्यक्ष रोहित पाटील, पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे, निवासी नायब तहसीलदार सुभाष बधे उपस्थित होते.
श्री शिवाजी महाविद्यालय, श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय, बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज तर कवायतीमध्ये सुलाखे हायस्कूल, जिजामाता, उर्दू शाळा, न्यू हायस्कूल आदी शाळा सहभागी झाल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.