request of Hasan Mushrif Dr Ajay Taware appointed at Sassoon Hospital Medical Superintendent Sakal
पुणे

Hasan Mushrif : ‘मुश्रीफ यांच्या आदेशानेच नियुक्ती’

नियुक्तीसाठी आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारसपत्र दिले होते. त्या आधारे मुश्रीफ यांनी तावरे यांच्या नियुक्तीचे आदेश दिले, अशी कबुलीही डॉ. काळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : ‘‘वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या सांगण्यावरूनच ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी डॉ. अजय तावरे यांची नियुक्ती केली,’’ असे सांगत बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी तावरे यांच्या नियुक्तीचे बिंग फोडले.

नियुक्तीसाठी आमदार सुनील टिंगरे यांनी शिफारसपत्र दिले होते. त्या आधारे मुश्रीफ यांनी तावरे यांच्या नियुक्तीचे आदेश दिले, अशी कबुलीही डॉ. काळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. पोर्श मोटार अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्याची अदलाबदल केल्याच्या आरोपावर तावरे यांच्यासह आपत्कालीन विभागातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हाळनोर आणि सफाई कर्मचारी अतुल घटकांबळे यांना पोलिसांनी अटक केली आहे. या पार्श्‍वभूमीवर काळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली.

काळे यांच्या अधिष्ठातापदाच्या अधिकारात तावरे यांची वैद्यकीय अधीक्षक म्हणून नियुक्ती केली होती. या बद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काळे यांनी थेट मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, ‘‘आमदार टिंगरे यांनी तावरे यांना वैद्यकीय अधीक्षक करण्यासाठी शिफारसपत्र दिले. त्यावर मुश्रीफ यांनी आदेश दिला. त्या आधारावर तावरे यांची नियुक्ती केली. तत्कालीन अधीक्षक हे प्राध्यापक नसल्याने त्यांच्या जागी प्राध्यापक असलेल्या तावरे यांना पद देण्यात आले.’’

काळे म्हणाले, ‘‘ससूनसारख्या मोठ्या संस्थेमध्ये वेगवेगळे ३० विभाग आहेत. प्रत्येक विभागाचे प्रमुख, तेथील प्राध्यापक, डॉक्टरांपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत विविध जण कार्य करत असतात. या प्रत्येकाकडे लक्ष देणे अशक्य आहे. हे सगळे जण रुग्णालयातगैरप्रकार घडू नये, यासाठी प्रयत्न करत असतात. त्यानंतरही प्रत्येक गोष्टीची माहिती अधिष्ठात्याला असतेच असे नाही.’’

या बाबत मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘तावरे याला पदभार देण्याची शिफारस केली होती. तो योग्य नव्हता; तर तसा अहवाल देणे हे अधिष्ठात्यांचे कर्तव्य होते. पण त्यानंतर घडलेल्या उंदीर चावल्याच्या प्रकरणात तावरे याची लगेच बदली केली होती.’’

‘‘ससून रुग्णालयात नजीकच्या काळात आमूलाग्र बदल करण्यात येणार आहेत. भविष्यात अशा प्रकारच्या घटना करण्याची हिंमत होणार नाही, अशी अद्दल या प्रकरणातील आरोपींना घडविण्यात येईल.’’

- हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT