YCMOU Sakal
पुणे

मुक्त विद्यापीठ कागदपत्रे पडताळणी तारिख बदण्याची मागणी

कागदपत्रांची पडताळणी 15 जून रोजी पुणे केंद्रावर होणार

मिलिंद संगई

बारामती - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यावतीने बहिस्थ बी. एड अभ्यासक्रमासाठी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज मागविण्यात आले होते. या अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रथम फेरीत मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी 15 जून रोजी पुणे केंद्रावर बोलविण्यात आले आहे.

विदर्भ सोडून राज्यातील सर्व शाळा याच दिवशी सुरू होत असल्याने शाळेच्या पहिल्याच दिवशी कागदपत्रे पडताळणी करण्यासाठी पुणे येथे जाण्याचे सर्वांनाच अडचणीचे ठरत असल्याचे प्राथमिक शिक्षकांनी सांगितले.

पुणे, कोल्हापूर, नांदेड येथील अनेक शिक्षकांनी 15 जून नंतरची तारिख या साठी द्यायला हवी अशी मागणी केली आहे. शाळा सुरु होण्याच्य पहिल्याच दिवशी शाळेचे कामकाज सोडून फक्त कागदपत्रे पडताळणीसाठी शक्य होणार नसल्याने हा बदल करण्यात यावा अशी शिक्षकांची मागणी आहे.

शाळेचा पहिला दिवस शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्याचे शासनाचे परिपत्रक आहे. त्यामुळे विद्यापीठाने या अडचणीचा विचार करुन कागदपत्रे पडताळणी पुढे ढकलावी अशी मागणी अनेक शिक्षकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT