नसरापूर, ता. ७ : शिवरे (ता. भोर) येथे रात्रीच्या सुमारास एका घराजवळ दुर्मीळ खवले मांजर आढळून आले. त्यास पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनच्या रेस्क्यू पथकाने वनविभागाच्या मदतीने सुरक्षित वनपरिक्षेत्रात मुक्त केले.
घटनास्थळी धाव घेतली.
वन्यप्राणी संस्थेचे कार्याध्यक्ष रघुनाथ वाडकर तसेच वन्यजीव रक्षक विनायक मोहिते, संतोष पाटील, सोन्या कांबळे व मधुर अवचरे यांनी काळजीपूर्वक खवले मांजराचे रेस्क्यू केले. त्यानंतर अध्यक्ष सुशील विभूते व उपाध्यक्ष शंकर वाडकर यांना माहिती देण्यात आली. विभूते यांनी नसरापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.
दरम्यान, खवले मांजराच्या शरीरावर जखम आहे का याची तपासणी करण्यात आली. प्रकृती व्यवस्थित असल्याचे आढळल्यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली त्याला पुन्हा सुरक्षित वनपरिक्षेत्रात मुक्त करण्यात आले.
नसरापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वसंत चव्हाण यांनी सांगितले की, खवले मांजर हा दुर्मीळ व संरक्षित वन्यजीव असून त्याची शिकार आणि बेकायदेशीर तस्करी होत असल्याने त्याच्या संरक्षणाला विशेष महत्त्व आहे.
वन्यजीव संस्थेचे अध्यक्ष सुशील विभूते यांनी सांगितले की, वाढती विकासकामे व उत्खननामुळे वन्यजीवांचा अधिवास कमी होत आहे. या वन्यजीवांना वाचवण्यासाठी वन्यजीव रक्षकांना आवश्यक साधनसामग्री व मदत मिळणे गरजेचे आहे.
06623
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.