BCG-Vaccine 
पुणे

लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लस कोरोनावर ठरतायेत उपयुक्त? पुण्यात बीसीजी लसीवर होणार संशोधन

सकाळवृत्तसेवा

पुणे - जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होत आहे. मात्र देशातील लहान मुलांमध्ये हा प्रसार तुलनेने कमी झालेला दिसतो. यावरून असे लक्षात येते की, लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लस यासाठी उपयुक्त ठरत असाव्या. म्हणून ससून सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्‍टरांच्या सहकार्याने डॉ. निलेश गुजर "बीसीजी' लसीवर संशोधन करणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बिबवेवाडी मधील गुजर बालरुग्णालयाचे डॉ. गुजर यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, सांख्यिकी माहिती संकलनाच्या आधारे ते निष्कर्ष काढणार आहे. बी. जै. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, डॉ. मालनगोरी परंडे आदींचा या संशोधनात सक्रिय सहभाग आहे. यासाठी नागरिकांना फोन करून माहिती घेण्यात येणार आहे. तेंव्हा नागरिकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा डॉ. गुजर यांनी व्यक्त केली आहे. 

बीसीजी लसीचा फायदा -
- कोविड आजाराची तीव्रता कमी 
- माफक दरात लस उपलब्ध 
- व्यापक प्रमाणात लस उपलब्ध 
- साईड इफेक्‍ट्‌स ची शक्‍यता कमी 

संशोधनाचे ठळक मुद्दे -
- संशोधनातील वयोगट 1 ते 18 वर्षे 
- कोणतेही इंजेक्‍शन अथवा औषध दिले जाणार नाही 
- कोरोनाची तपासणी केलेल्या मनपा मधील नागरिकांकडून फोनवरून माहिती संकलन 
- क्‍लिनिकल ट्रायल रजिस्ट्री ऑफ इंडियाची परवानगी 
- वैयक्तिक माहितीची गोपनीयता व विश्वासपात्रता 

संशोधकांना पुणेकर नागरिकांकडून लागणारी माहिती 
- कोरोना चाचणी झालेल्या 18 वर्षाच्या आतील मुलामुलींचा जन्म तारखेचा पुरावा 
- लसीकरणाची माहिती 
- आजाराविषयी माहिती 
- कोविड रिपोर्ट व उपचारांची माहिती 

Edited By - Prashant Pati

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E20 टाकल्याने वाहनाच्या कोणत्या गाड्यांचे होईल नुकसान? 'हे' पार्ट होणार खराब; सरकारने दिली महत्त्वाची माहिती

'लंकापती'चा रौद्र अवतार; तर रणबीर कपूरचा 'राम' पाहून चाहते भारावले! परंतु हनुमान सनी देओलच दिसला नाही, 'रामायण'चा ट्रेलर पाहिलात का?

Almatti Dam Controversy : आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यावरून गिरीष महाजनांचा कर्नाटकला थेट इशारा; सांगली-कोल्हापूरच्या महापुराबाबत मोठं विधान

Latest Marathi News Live Update : अमरावती मार्गावर भीषण अपघात, एसटी बसची ट्रकला जोरात धडक, एकाचा मृत्यू, १० जण गंभीर जखमी

Telegram Founder: ‘टेलिग्राम’चा संस्थापक गुन्हेगारांच्या यादीत; दहशतवादाला मदत केल्याचा रशियाकडून ठपका

SCROLL FOR NEXT