Hand
Hand 
पुणे

‘सहकार’मधील रोजगारावर संशोधन

सकाळवृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्रात सहकारी बॅंका, पतसंस्था, कारखाने यांसह अनेक क्षेत्रांत सहकार क्षेत्र विस्तारलेले आहे; पण या सहकार क्षेत्रामुळे रोजगार किती निर्माण झाला, अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम झाला, याचा अभ्यास केला गेलेला नाही, त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकार अध्यासनाने सहकारी संस्थांमधून होणाऱ्या रोजगारनिर्मितीवर संशोधन प्रकल्प हाती घेतला आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विखे पाटील अध्यासनात नुकतीच मार्गदर्शक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला संशोधन अभ्यासासाठी निवडलेल्या नागरी सहकारी बॅंका व सहकारी पतसंस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नागरी सहकारी बॅंका व सहकारी पतसंस्थांकडून संशोधनासाठी माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराची संधी किती आहे, सहकारी संस्थांनी कर्ज दिलेल्या विविध व्यावसायिक संस्थांमधील नोकरीची संधी आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला, याचा अभ्यास केला जाणार आहे. या माहितीचे विश्‍लेषण करून जो निष्कर्ष येईल त्याचा अहवाल निती आयोगाला सादर केला जाणार आहे. 

मार्गदर्शन मंडळात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एन. एस. उमराणी, रिझर्व्ह बॅंकेचे संचालक सतीश मराठे, माजी सहकार आयुक्त मधुकर चौधरी, जनसेवा बॅंकेचे उपाध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ आणि अमित ओझे यांचा समावेश आहे.  

अभ्यासात मुंबईतील सेंटर फॉर को-ऑपरेटिव्ह स्टडीज अँड रिसर्च इन को-ऑपरेशन या संशोधन संस्थेचा सहभाग असणार आहे, असे अध्यासनाचे प्रमुख प्रा. मुकुंद तापकीर यांनी सांगितले. मराठे यांनीही मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: धोकादायक डेव्हिड मिलर आऊट; सुरुवातीच्या धक्क्यांनंतर गुजरातचा सावरला डाव

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT