arrears sakal
पुणे

Bank Arrears : राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये दीड लाख कोटींची ३५९ जणांकडे थकबाकी

सजग नागरिक मंचाने माहिती अधिकारात रिझर्व्ह बँकेकडे थकबाकीदारांची माहिती मागितली होती. बॅंकेने दिलेल्या माहितीवरून धक्कादायक बाब समोर आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये शंभर कोटी रुपयांहून अधिक रकमेची थकबाकी असणाऱ्यांची संख्या ३५९ एवढी आहे. त्यांच्याकडे दीड लाख कोटी रुपयांहून अधिक थकबाकी असल्याचे रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीवरून समोर आले आहे.

सजग नागरिक मंचाने माहिती अधिकारात रिझर्व्ह बँकेकडे थकबाकीदारांची माहिती मागितली होती. बॅंकेने दिलेल्या माहितीवरून धक्कादायक बाब समोर आली आहे. क्षमता असूनही कर्जफेड न करणाऱ्या एक कोटीहून अधिक थकबाकीदारांची यादी रिझर्व्ह बँक आणि क्रेडिट रेटिंग कंपन्यांना कळविणे एका नियमानुसार बंधनकारक आहे.

त्यानुसार मंचाने रिझर्व्ह बँकेकडे स्टेट बॅंकेसह सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदारांची अद्ययावत यादी व प्रत्येकाच्या थकीत कर्जाची माहिती मागितली. त्यावर बँकेने ३१ मार्चपर्यंत थकबाकी असलेल्या दोन हजार ४९१ थकबाकीदारांची यादी उपलब्ध करून दिली आहे.

सर्व थकबाकीदारांकडे मिळून दोन लाख पाच हजार ४५९ कोटींची थकबाकी आहे. त्यातील एक हजार कोटींच्या वर थकबाकी असणारे राष्ट्रीयीकृत बॅंकांचे २८ थकबाकीदार असून, त्यांच्याकडे ६४ हजार १०३ कोटींची थकबाकी आहे, असे मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले.

पाचशे ते एक हजार कोटींच्यादरम्यान थकबाकी असणारे स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे एकूण सहा थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे तीन हजार ९४८ कोटींची थकबाकी आहे. उर्वरित राष्ट्रीयीकृत बॅंकांची पाचशे ते एक हजार कोटी रुपये असलेल्या थकबाकीदारांची संख्या ३३ आहे. त्यांच्याकडे २२ हजार ५४५ कोटींची थकबाकी आहे.

त्याच बँकेचे शंभर ते पाचशे कोटींच्या थकबाकीदारांची संख्या ४८ असून, त्यांच्याकडे ५३ हजार २८४ कोटी थकबाकी आहे. यावरून शंभर कोटींच्या वर थकबाकी असणारे स्टेट बँकेसह सर्वच राष्ट्रीयीकृत बॅंकांचे ३५९ थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे दीड लाख कोटींची थकबाकी आहे, असेही वेलणकर सांगितले.

रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीवरून, ठरावीक कर्जदारांनी स्टेट बँकेसह अन्य राष्ट्रीयीकृत बॅंकांना अडचणीत आणले आहे. नऊ कंपन्यांकडे स्टेट बॅंकेचे चार हजार ४०९ कोटी, तर इतर राष्ट्रीयीकृत बॅंकांकडे २२ हजार ११७ कोटी रुपये थकले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

‘सजग’चे काही प्रश्‍न

  • रिझर्व्ह बँक, स्टेट बँक ऑफ इंडियासह उर्वरित राष्ट्रीयीकृत बॅंकांनी कर्जदारांची यादी स्वतः च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध का केली नाही?

  • एकच कर्जदाराला स्टेट बँकेसह विविध राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून शेकडो कोटींचे कर्ज कसे दिले जाते?

  • मोठ्या कर्जांना संचालक मंडळ मान्यता देते. संचालक मंडळाची जबाबदारी कोण कशी व कधी निश्चित करणार?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT