पुणे

मुंढवा-मांजरी रस्त्यांवर वाहतूक कोंडीने रहिवाशी व चालक त्रस्त

कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नंदू लोणकर यांनी केली आहे.

कैलास गावडे

मुंढवा : मुंढवा-मांजरी रस्त्यांवर पडलेले खड्डे, अरूंद रस्ता, अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक, बेशिस्त वाहनचालक यामुळे मुंढवा-मांजरी रस्त्यांवर केशवनगर येथे गेल्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होवून, वाहनांच्या लांब रांगा लागत असून, रहिवाशी व वाहनचालकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. कोंडी सोडविण्यासाठी वाहतुक विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नंदू लोणकर यांनी केली आहे.

केशवनगर मांजरी हा रस्ता अरुंद आहे. येथील लोणकर वस्ती चौकात वाहनचालकांच्या बेशिस्तपणामुळे दिवसातून अनेक वेळा वाहने अडकतात. त्यामुळे मांजरी व केशवनगरकडे तसेच साडेसतरा नळी व चौधरी गोठा रस्त्यावर सुमारे आर्धा किलोमीटर वाहनांच्या रांगा लागतात. येथून पोलिसांकडून बंदोबस्त ठेवत वाहतूक नियमनावर भर दिला जातो. पण संध्याकाळी पोलिस गेल्यावर, होणाऱ्या वाहतूक कोंडीमध्ये वाहनचालकांना आर्धा तास या वाहतूक कोंडीत अडकण्याची वेळ येते.

विक्रम लोणकरः- (वाहनचालक)या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेकवेळा अपघातही होवून चालकांचा व पादचाऱ्यांचा अपघातात बळी गेला आहे. सायंकाळच्या वेळी या रस्त्यावर सुमारे अर्धा ते एक तास अडकून राहावे लागते. पोलिसांनी कोंडी सोडविण्याची गरज आहे.

दादा आहिरेः-(स्थानिक नागरिक) केशवनगर येथील लोणकर वस्ती चौकात दररोज संध्याकाळी आणि रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. तसेच या वाहतूक कोंडीमुळे मोठ्या प्रमाणावर धूर निघून प्रदुषणाचा प्रचंड त्रास नागरिकांना होत आहे. येथे रस्त्याचे दोन्ही बाजूस पाच फुटाचे रूंदीकरण केल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटेल.

या रस्त्यावर उपाययोजनांची आवश्यकता

  1. केशवनगर-मांजरी रस्ता प्रजिमा ३४, या रस्त्याचे रूंदीकरण १९८६ च्या डीपी प्रमाणे करावे.

  2. लोणकर चौकात रात्रीसुध्दा वाहतूक पोलिस नेमावा.

  3. रस्त्यांवरील खड्डे बुजवावे.

  4. संध्याकाळी अवजड वाहनांना मनाई करावी.

  5. रस्त्यांवर पार्कींग केलेल्या वाहनांवर कारवाई करावी.

  6. रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करावी.

  7. वाहतुक विभागाचे सहा.पोलिस निरीक्षक सूरजकुमार राजगूरू म्हणाले, या चौकात वार्डन व एक वाहतूक पोलीस संध्याकाळी वाहतूक नियमनासाठी नेमलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2026: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् भारतीय संघाची विजयी सुरुवात! प्रतिस्पर्ध्यांना ६५ धावांवर केलं ऑलआऊट

Nepal Flood: नेपाळच्या मदतीला भारत धावला! महापुरामुळे वीज संकट; मागणीनुसार अतिरिक्त वीजपुरवठा करणार

Asia Cup 2026: बलाढ्य टीम इंडिया शफालीच्या फिफ्टीनंतरही थायलंडसमोर ढासळली; किती धावांचे ठेवले टार्गेट?

Abhijeet Dipke: विजेता दहिया यांची CJPमध्ये एन्ट्री होणार? अभिजीत दिपकेंनी दिलं मोठं उत्तर; स्पष्ट केली भूमिका

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला अभिजीत दिपकेंचा पाठिंबा; सरकारला दिला थेट इशारा

SCROLL FOR NEXT