purandar society 
पुणे

...म्हणून रहिवासीच बनले सुरक्षारक्षक 

सकाळवृत्तसेवा

सहकारनगर : मुकुंदनगर येथील पुरंदर सोसायटीच्या रहिवाशांनी लॉकडाउनचा उद्देश साध्य करण्यासाठी सोसायटीचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून सुरक्षा रक्षकावर अवलंबून न राहता स्वतःच सुरक्षा रक्षक बनले आहेत. सोसायटीतील प्रत्येक सभासद पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत एक तास स्वयंसेवक म्हणून काम करीत आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेर येणाऱ्या जाणाऱ्यांवर देखरेख ठेवत आहे. "कोविड 19 ' या नावाने नोंद वही ठेवली आहे. सोसायटीच्या सर्व सभासदांनी सुरक्षेसाठी या उपक्रमास प्रतिसाद दिला आहे.

याबाबत किशोर शिंदे म्हणाले, "कोविड 19' या नावाने नोंदवही तयार केली असून सोसायटीतून अत्यावश्‍यक कामाशिवाय व मास्क लावल्याशिवाय कोणास बाहेर सोडले जात नाही.

बाहेर जाताना येताना नोंद करणे सक्तीचे करण्यात आले आहे. सोसायटीच्या सभासदांशिवाय कोणास प्रवेश दिला जात नाही. सोसायटीच्या सुरक्षेसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी चेअरमन अंकुश भोसले, कोशाध्यक्ष डॉ. दिलीप बोरा, रवींद्र लाळे, सदस्य सुधीर शेळके आदींनी पुढाकार घेतला आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी शंकर, तू माझी पार्वती! स्वयंघोषित धर्मगुरूचा पुण्यातील ३५ वर्षीय महिलेवर अत्याचार; पीडितेचे गंभीर आरोप

Gas Cylinder Shortage : हॉटेलांसह अनेक चहा-वडापाव स्टॉलही बंद; व्यावसायिक सिलिंडर पुरवठा ठप्प, लहान-मोठ्या खाद्य व्यवसायांची कोंडी

Sangola Crime : हरवलेल्या १०० महिलांचा लावला शोध; सांगोला पोलिसांची कामगिरी, दहा मुली कुटुंबीयांच्या स्वाधीन

भाजपला एका वर्षात देणगीपोटी मिळाले ६ हजार कोटी, सर्वाधिक कॉर्पोरेट सेक्टरमधून; एकट्या भाजपला काँग्रेससह ४ पक्षांच्या दहापट देणगी

Solapur News : दोन कोटी रुपये खर्चून बेलाटीत उभारणार राम मंदिर; भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण

SCROLL FOR NEXT