पुणे : राज्यातील दहापेक्षा कमी सदनिका असलेल्या इमारतीतील रहिवाशांना राज्य सरकारने अखेर मोठा दिलासा दिला आहे. अशा इमारतीतील रहिवाशांना सोसायटी स्थापन करून मानीव अभिहस्तांतरणासाठी (कन्व्हेनन्स डिड) अर्ज करता येणार आहे. त्यामुळे अशा इमारतीतील रहिवाशांचा मालकी हक्काचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्र को.- ऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टमध्ये राज्य सरकारकडून नुकताच बदल करण्यात आला आहे. यापूर्वी सोसायटी स्थापन करण्यासाठी किमान अकरा सदस्य असावे, असे बंधनकारक होते. परंतु पुण्यासह राज्यात अनेक शहरांमध्ये दहा पेक्षा कमी सदनिका असलेल्या इमारती आहेत. अशा इमारतीतील नागरिकांना सोसायटी स्थापन करता येत नव्हती. पर्यायाने त्यांना अपार्टमेन्ट स्थापन करावी लगत होती. तर इमारतीखाली जमीन मालकी हक्काने करून घेण्यासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. तसेच अशा इमारतीतील रहिवाशांना महाराष्ट्र को. ऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टचे फायदे त्यांना मिळत नव्हते. याशिवाय कोणताही कायदेशीर पेच निर्माण झाल्यानंतर थेट न्यायालयात धाव घ्यावी लागत होती. आता या सगळ्या अडचणी दूर झाल्या आहेत.
VIDEO - पुण्यात हॉस्पिटलमध्ये बेडसाठी रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ
राज्य सरकारने 2018 मध्ये दहा पेक्षा कमी सदनिका असलेल्या इमारतीतील सदस्यांना देखील सोसायटी स्थापन करून "कन्व्हेनन्स डिड' करून घेता यावे, यासाठी कायद्यातील बदल प्रस्तावित करण्याबाबतचे विधेयक मांडले होते. परंतु या विधयकेला राज्य सरकारकडून वारंवार मुदत वाढ देण्यात आली. मात्र नुकतीच त्यास राज्य सरकारने मान्यता दिल्यामुळे त्यांचे कायद्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे दहा पेक्षा कमी सदनिकाधारक असलेल्या इमारतीतील किमान पाच किंवा एकूण सभासदांच्या 51 टक्के सदस्यांना एकत्रित येऊन सोसायटी स्थापन करता येणार आहे. तसेच सहकार खात्याचे उपनिबंधक यांच्याकडे "कन्व्हेनन्स डिड' साठी अर्ज करता येणार आहे.
राज्य सरकारकडून महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्टमध्ये हा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील अनेक छोट्या इमारतीतील रहिवाशांना त्याचा फायदा होणार आहे. "कन्व्हेनन्स डिड'साठी त्यांना उपनिबंधकांकडे अर्ज करून इमारतीतील खालील जमिनीवर मालकी हक्काची नोंद घालता येणार आहे.
- अॅड नितीन कांबळे
पोलिस काढणार रेखाचित्रातून आरोपींचा माग; पाच दिवसांच्या अभ्यासक्रमाची सुरुवात
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.