पुणे

३५ वर्षांचा रस्ता वाद अखेर ‘बांधावरच न्याय निवाड्या’तून मिटला!

CD

POH26A00664
माहेगाव देशमुख ः येथील ३५ वर्षांपासून रस्त्याचा प्रलंबित वाद मिटविताना तहसीलदार महेश सावंत व शेतकरी.

पस्तीस वर्षांचा रस्ता वाद अखेर मिटला
‘बांधावरच न्याय निवाड्या’तून दिलासा ः प्रत्यक्षात खुला

सकाळ वृत्तसेवा
पोहेगाव, ता. १९ ः न्यायालयीन निकाल होऊनही ३५ वर्षांपासून रस्त्याचा प्रश्‍न कायम असलेल्या कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील वादावर अखेर ‘बांधावरच न्याय निवाडा’उपक्रमातून सामंजस्याने तोडगा काढण्यात आला.
तहसीलदार महेश सावंत यांनी घटनास्थळी पाहणी करून दोन्ही पक्षकारांशी संवाद साधला आणि अर्जदारास १२ फूट रुंदीचा रस्ता उपलब्ध करून दिला. या वादामुळे दुरावलेले दोन्ही पक्षकार बालपणीचे शाळेतील वर्गमित्र या सामंजस्याने केवळ रस्त्याचा प्रश्‍न सुटला नाही, तर जुन्या मैत्रीतील दुरावाही दूर झाला.
माहेगाव देशमुख येथील हा रस्ता विवाद ३५ वर्षांपासून प्रलंबित होता. या प्रकरणाचा दिवाणी न्यायालयात २००० मध्ये, तर उच्च न्यायालय, खंडपीठात २०१३ मध्ये पाठपुरावा झाला होता. न्यायालयीन प्रक्रियेत निकाल लागल्यानंतरही अर्जदारास प्रत्यक्ष रस्ता उपलब्ध होत नसल्याने हा प्रश्‍न कायम राहिला होता.
कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी ‘बांधावरच न्याय निवाडा’ या उपक्रमांतर्गत प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत घटनास्थळी पाहणी केली. त्यांनी वादी व प्रतिवादी यांच्याशी स्वतंत्र, तसेच संयुक्त संवाद साधत दोन्ही बाजू समजून घेतल्या. यानंतर सामंजस्यातून तोडगा काढण्यात यश आले. अर्जदारास १२ फूट रुंदीचा रस्ता प्रत्यक्ष उपलब्ध करून देण्यात आला.
-----------
उपक्रम ठरतोय प्रभावी
तालुक्यात ‘बांधावरच न्याय निवाडा’ उपक्रमांतर्गत सामंजस्याने निकाली काढण्यात आलेल्या रस्ता विवादांची संख्या ८९ वर पोहोचली आहे. न्यायालयीन प्रक्रिया पार पडूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी अभावी प्रलंबित राहणाऱ्या प्रश्‍नांवर घटनास्थळी संवादातून तोडगा काढण्याचा हा उपक्रम प्रभावी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘प्रश्न विचारणं हा विद्यार्थ्यांचा स्वभाव’; ‘छात्रों की गूंज’मधून राहुल गांधींचं पुन्हा सरकारवर टीकास्र, नेमकं काय म्हणाले?

Muslim Family: दहा वर्षांपासून मुस्लिम कुटुंबाच्या घरी गौरीचा जागर; लोहाऱ्यात धार्मिक सलोख्याची अनोखी परंपरा

दीपिका-रणवीरने केली दुसऱ्या बाळाच्या जन्माची घोषणा, 'दुआ' बनली मोठी बहीण; पाहा पोस्टमध्ये काय लिहिलंय

Latest Marathi News Update : ८ महिन्यांची चिमुकली अचानक बेपत्ता; संशयित आरोपीनं संपवलं जीवन

Ketan Agrawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांकडून २५०० पानी चार्जशीट दाखल

SCROLL FOR NEXT