Mahavitaran 
पुणे

वीजबिलांच्या तक्रारींसाठी 'महावितरण'ने उचललं 'हे' पाऊल; वाचा सविस्तर बातमी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जून महिन्यामध्ये मागील दोन महिन्यांसह मीटर रीडिंगनुसार वीजबिल दिल्यानंतर त्याबाबतीत ग्राहकांमध्ये असलेल्या शंकांचे निरसन तसेच तक्रारींचे निवारण करण्यासाठी महावितरणने 'ग्राहक तक्रार निवारण कक्ष' सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. या कक्षात वीजबिलांबाबत ग्राहकांचा संभ्रम दूर करण्याबरोबरच विविध ठिकाणी मेळाव्यांसह "वेबिनार'चे देखील आयोजन करण्यात येणार आहे. 

लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ग्राहकांकडील मीटरचे रीडिंग घेता आले नाही. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात सरासरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले. सध्या, मीटर रीडींग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार एप्रिल व मे महिन्यांसह जून महिन्याचे एकत्रित वीजबिल देण्यात येत आहे. या वीजबिलाबाबत ग्राहकांमध्ये असलेला संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणच्या शाखा, उपविभाग, विभाग, मंडल व परिमंडलस्तरावर ग्राहक तक्रार निवारण कक्ष सुरु करण्यात आले असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. 

महावितरणमधील तांत्रिक, लेखा, वित्त, आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे वेगवेगळे गट तयार करून हे कक्ष सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये जून महिन्याच्या वीजबिलाची आकारणी सांगण्यात येईल व ग्राहकांच्या तक्रारी व शंका दूर करण्यात येईल. तसेच शहरी भागात मोठमोठ्या रहिवाशी क्षेत्रांत किंवा सोसायट्यांमध्ये आणि ग्रामीण भागात गाव किंवा वाडी पातळीवर ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असून वीजबिलांबाबत संभ्रम व तक्रारी दूर करण्यात येणार आहेत.

त्याच बरोबरच मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता यांच्यास्तरावर "वेबिनार'चे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच पालकमंत्री, मंत्री, राज्यमंत्री तसेच खासदार, आमदार तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी यांची महावितरणचे अधिकारी भेट घेऊन त्यांना जून महिन्याच्या वीजबिलाबाबत सविस्तर माहिती देणार आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शंका किंवा तक्रारी असल्यास...
महावितरणच्या https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर केवळ ग्राहक क्रमांक नमूद करून वीजबिलाची सविस्तर आकारणी तपासून पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महावितरणने एसएमएसद्वारे ही लिंक वीजग्राहकांना पाठविली आहे. यानंतरही काही शंका किंवा तक्रारी असल्यास महावितरणच्या कार्यालयात वीजबिलाबाबत योग्य माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही महावितरणने कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्पच्या धमकीनंतर सोन्याचे भाव कोसळले! मार्च महिन्यात सोनं तब्बल 35 हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

CM Devendra Fadnavis : 'भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी कोणालाही सोडणार नाही'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कडक इशारा, रूपाली चाकणकरांबाबत काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update : सातारा जिल्हा परिषद निवडणूक मुद्द्यावर मंत्री शंभुराज देसाई आक्रमक

Panchang 23 March 2026: आजच्या दिवशी शिव कवच स्तोत्राचे पठण आणि ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

5 वर्षांनी स्वामींच्या भूमिकेला दिला निरोप! अक्षयची 'जय जय स्वामी समर्थ' मालिकेतून एक्झिट, 'हे' ज्येष्ठ अभिनेते साकारणार भूमिका

SCROLL FOR NEXT