पुणे

तेली समाजाचा बाणवकुळेंच्या वक्तव्याचा तीव्र निषेध ‘अपशब्द वापरणाऱ्यांनी संयम पाळावा’; महाराष्ट्र प्रांतिक तेलिक महासभेचा इशारा

CD

अपशब्द वापरणाऱ्यांनी संयम पाळावा

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचा इशारा

अकोले, ता. १० ः आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविषयी मनोज जरांगे यांनी केलेल्या आक्षेपार्ह व मर्यादाभंग करणाऱ्या वक्तव्यांचा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. लोकशाही व्यवस्थेत मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार असला, तरी व्यक्तीचा अवमान करणारी भाषा खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा महासभेने दिला आहे.

सार्वजनिक जीवनात शासनाच्या धोरणांवर, निर्णयांवर किंवा सार्वजनिक व्यक्तींच्या भूमिकेवर टीका करण्याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. मात्र, टीका आणि व्यक्तिगत अवमान यातील सीमारेषा ओलांडणे योग्य नाही. समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या, तसेच सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या वक्तव्यांना विरोध करणे आवश्यक असल्याचे महासभेने म्हटले आहे.

लोकशाहीमध्ये राजकीय मतभेद आणि संघर्ष असणे स्वाभाविक आहे. मात्र, कोणत्याही नेत्याविषयी अशोभनीय, असभ्य किंवा अपमानकारक भाषा वापरून सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा लोकशाही व संविधानिक मार्गाने आपली भूमिका मांडत असून, समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्यांना योग्य पद्धतीने उत्तर दिले जाईल. सार्वजनिक जीवनात मतभेद असले, तरी व्यक्तीचा सन्मान राखणे हीच लोकशाहीची खरी संस्कृती असल्याचे महासभेने म्हटले आहे. हे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना पाठविण्यात आले आहे.

विभागीय तैलिक महासभेच्या महिला अध्यक्षा विद्या करपे, रवींद्र करपे, चमन घाटकर, उपाध्यक्ष बापू काळे, सरपंच संतोष बनसोडे, किशोर काळे, अशोक शिंदे, विनायक घाटकर, शेखर वाळझाडे आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT