पुणे

#TeamUpToCleanUp ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ उपक्रमास प्रतिसाद

सकाळवृत्तसेवा

विश्रांतवाडी-  धानोरी येथील गोल्डन सिटी आणि पोलाईट पॅराडाइज सोसायटी व परिसरामध्ये सोनाटा गणेशोत्सव, सकाळ सोशल फाउंडेशन आणि पुणे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात दोन्ही सोसायट्यांमधील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. त्यांना येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे स्वच्छता अधिकारी व कर्मचाऱ्यांचे  सहकार्य मिळाले. 

सकाळ सोशल फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांच्या ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ या मोहिमेचा एक भाग म्हणून गणेशोत्सवाच्या दरम्यान या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात गोल्डन सिटी सोसायटीचे सुनील मेनन, विष्णू साळुंके, गणेश ढगे, डॉ. स्वरणेदू बॅनर्जी, अभिषेक पांडे, शिवचरण भारती, चंदन शिवे, तर पोलाइट पॅराडाइज सोसायटीचे दादासाहेब लांडगे, अरुण पानसरे, सुषमा राठोड, कविता लांडगे, कलावती राठोड, आशा इंगळे, दमयंती खैरे, अर्चना पानसरे, पांडुरंग काकडे, नीलेश खैरे, अरुण पुंडलिक, सुभाष राठोड, बिनय कुमार, तपन मकडिया, अभिलाष पुलावळे, अतुल केदार, प्रसाद  सोनवणे आदी नागरिक सहभागी  झाले होते. 


महापालिकेचे उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, येरवडा क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त विजय लांडगे, वरिष्ठ आरोग्य अधिकारी संजय घावटे, आरोग्यनिरीक्षक मयूर मांढरे, अमोल म्हस्के, सुरेखा वाघमोडे, विशाल ओव्हाळ, मुकादम शेखर  टकले यांच्यासह कर्मचारी या अभियानात सहभागी झाले होते.  

‘ओला व सुका कचरा वेगळा करावा, आपला परिसर स्वच्छ ठेवावा,’ असे आवाहन सकाळच्या स्वयंसेवकांनी या वेळी केले. याप्रसंगी नगरसेविका रेखा टिंगरे, चंद्रकांत टिंगरे यांनी  भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला विवाहसोहळा! नवरा आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेता

Mahatma Phule Jan Arogya Yojana: गरजू रुग्णांना मोठा दिलासा; महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून २३९९ प्रकारच्‍या आजारांवर उपचार

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील उत्तम नगर येथील आरोपीचे घर बुलडोझरने पाडण्यात येणार

Gujarat Crime: प्रसिद्ध मंदिराच्या बाथरूममध्ये दोन विद्यार्थिनी आढलल्या मृतावस्थेत ; ChatGPT ला विचारली जीवन संपवण्याची पद्धत

India Fuel Prices Stable : मोठी दिलासादायक बातमी ! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार नाहीत, होर्मुझ सामुद्रधुनीतून पहिली तेल खेप रवाना

SCROLL FOR NEXT