पुणे

भोरमध्ये दक्ष नागरिक पोलिस मित्र कार्यशाळेस प्रतिसाद

CD

भोर, ता. १६ : ‘महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पोलिस मित्रांच्या भूमिकेत दक्ष राहून समाजासाठी काम करावे,’’ असे मत दक्ष नागरिक पोलिस मित्र संस्थेचे केंद्रीय महासंचालक राजेश भोसले यांनी व्यक्त केले. येथील राजगड ज्ञानपीठाच्या अनंतराव थोपटे महाविद्यालयात घेण्यात आयोजित केलेल्या दक्ष नागरिक पोलिस मित्र कार्यशाळेत ते बोलत होते. एक दिवसाच्या कार्यशाळेत महाविद्यालयातील १५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये राष्ट्रपती पारितोषिक विजेते माजी पोलिस अधिकारी संपतराव जाधव, राज्याचे माजी पोलिस उपमहानिरिक्षक धनाजीराव चौधरी, माजी पोलिस निरीक्षक महादेव पवार, कात्रज शहर महिला पोलिस मित्र संघटनेच्या अध्यक्षा गौरी गद्रे, अध्यक्ष सुहास तडे, अविनाश संकपाळ व नंदकुमार इनामदार यांनी मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख यांनी या कार्यशाळेमागची भूमिका स्पष्ट केली. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना ‘पोलिस मित्र’ हा दर्जा देण्यात येणार आहे. पोलिस मित्र होणारे विद्यार्थी हे समाजामध्ये पोलिसांच्या मदतीने महत्त्वाची भूमिका बजावतील अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयातील परीक्षा विभाग प्रमुख प्रा. के. जे. चव्हाण, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.व्ही.आर. सूर्यवंशी, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. डॉ. डी. बी भोसले, प्रा. समाधान जेटीथोर आदींनी या कार्यशाळेसाठी विशेष प्रयत्न केले. प्रा. एस. ए. चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. डी. बी. भोसले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: RBIचा मोठा निर्णय! रेपो दर किती? तुमच्या लोन, EMI आणि FDवर काय परिणाम? महागाई वाढणार?

Iran-US Ceasefire : अमेरिका-इराणमध्ये शस्त्रसंधीची घोषणा होताच कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Gold Rate Today: युद्ध थांबल्याने सोन्याचे भावात अचानक मोठा बदल! काय आहे आजचा ताजा भाव?

Latest Marathi News Live Update: मुक्ताईनगर ते कु-हा मार्गावर पुन्हा वाघाचे दर्शन, वाहनधारकांची उडाली तारांबळ

Video Viral : शार्दूल ठाकूरने बाद करताच वैभव सूर्यवंशी ढसाढसा रडला; तो फटका का खेळला? स्वतःवरच चिडला

SCROLL FOR NEXT