Vikram Kumar Sakal
पुणे

पुणे महापालिकेवर १५ मार्चपासून प्रशासक, विक्रम कुमार यांच्याकडे जबाबदारी

पुणे महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी आचारसंहिता लागणे अशक्य असल्याने आता महापालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिकेची मुदत संपण्यापूर्वी आचारसंहिता लागणे अशक्य असल्याने आता महापालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

पुणे - पुणे महापालिकेची (Pune Municipal) मुदत संपण्यापूर्वी आचारसंहिता (Code of Conduct) लागणे अशक्य असल्याने आता महापालिकेवर प्रशासक (Administrator) नेमण्याचा निर्णय राज्य शासनाने (State Government) घेतला आहे. १५ मार्च पासून महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) हे प्रशासक म्हणून काम करणार आहेत.

पुणे महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी- मार्च महिन्यात होऊन १३ मार्च पूर्वी नवी महापालिका अस्तित्वात येणे आवश्‍यक होते. पण कोरोना आणि ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे महापालिकेची निवडणूक पुढे गेली आहे. ही निवडणूक दोन महिने ते सहा महिने पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे १४ मार्च नंतर पुणे महापालिकेवर प्रशासक येणार हे निश्‍चीत झाले आहे. त्यामुळे तत्काळ प्रशासक नेमण्यात यावा असे आदेश राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडून देण्यात आले आहेत. ही जबाबदारी १५ मार्चपासून महापालिका आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक म्हणून काम करणार आहेत.

याबाबत विक्रम कुमार यांनीही दुजोरा दिला असून, १५ मार्च पासून प्रशासक म्हणून काम करण्याचे आदेश मिळाले आहेत, असे कुमार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baby Trafficking Case: चार वेळा विकलेले एक महिन्याचे बाळ तेलंगणमधून परत ताब्यात; संभाजीनगर पोलिसांनी बाळ विक्री रॅकेटचा पर्दाफाश

Uttarakhand: उत्तरकाशीत पावसाचे थैमान; ८० ट्रेकर्सची सुटका, उर्वरितांच्या बचावासाठी बचावासाठी ८ हेलिकॉप्टर्स मैदानात video viral

Marathi News Live Updates: १७ डिसेंबरनंतर बघू, सरकारला जरांगे पाटलांचा थेट इशारा; तीन महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुढची भूमिका काय?

Oppo K14 Plus 5G स्मार्टफोन लाँच; 144Hz AMOLED डिस्प्ले आणि 45W फास्ट चार्जिंगचा धुमाकूळ! पहा किंमत...

Childhood Cancer Symptoms : मुलाला येणारा ताप केवळ सामान्य ताप नसू शकतो; पालकांनी 'या' धोक्याच्या घंटा कधी ओळखाव्या? तज्ज्ञांनी दिला गंभीर आजाराचा इशारा

SCROLL FOR NEXT