lock down 
पुणे

जेजुरीकरांनो, प्रतिबंधित क्षेत्रातून सुटका होतेय, पण या आहेत अटी... 

तानाजी झगडे

जेजुरी (पुणे) : जेजुरीत उद्यापासून (ता. २८) सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रतिबंधीत क्षेत्रासाठी सकाळी नऊ ते दुपारी दोनपर्यंतच वेळ देण्यात आली आहे. शनिवारी रुग्णालयाच्या सेवा वगळता सर्व व्यवहार बंद असणार आहेत.

जेजुरीत गेली चौदा दिवस अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते. आज मुख्याधिकारी पूनम कदम यांनी उद्या सोमवारपासून सर्व दुकाने खुली होतील, मात्र त्यासाठी नगरपालिका प्रशासनाने नियमावली तयार केली आहे. त्यामध्ये नियम व अटी पाळून दुकाने खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. घराबाहेर व्यायाम करण्यास सकाळी पहाटे पाच ते सायंकाळी सात वाजेपर्यंत नियम पाळून परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल व्यावसायिकांना पार्सल सुविधा देण्यासाठी सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. फळे व भाजीपाला सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंतच विक्री करता येणार आहे. केशकर्तनालय, लॉज, पानायल शासनाने ठरवून दिलेल्या वेळेतच व नियमानुसार सुरु राहतील. लग्न व अंत्यसंस्कारासाठी वीस जणांच्या उपस्थितीची शासनाची अट कायम आहे. 

सर्व दुकानदारांनी योग्य ती खबरदारी घेऊन व्यावसाय करावेत असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे. शनिवार हा नेहमीप्रमाणे कडकडीत बंद राहील. शनिवारी रुग्णालये, औषध दुकाने व दुध विक्रीलाच परवागनी देण्यात आली आहे. गेली चौदा दिवस जेजुरीत फक्त अत्यावश्यक सेवा सुरु होत्या.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT