पुणे

अवाजवी आडसाली ऊस लागवडीवर मर्यादा

CD

सोमेश्वरनगर, ता. २१ : ऊस लागवड हंगाम एक जुलैपासून सुरू होणार, रोपपद्धतीची लागवड नोंद केल्यापासून तीस दिवसांत करावी, अवाजवी आडसाली लागवडीवर मर्यादा आणावी, असे निर्णय सोमवारी (ता.२०) सोमेश्वर साखर कारखान्याच्या सभासदांनी चर्चासत्रात घेतले.

सोमेश्वर साखर कारखान्यावर प्रथमच ऊस लागवड व गाळप नियोजन पारदर्शक होण्यासाठी ''सभासद चर्चासत्राचे'' आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप होते. सभेमध्ये को ८६०३२ ची तोडणी संपल्यावरच फुले २६५ ची तोड सुरू करायची हा निर्णय मागे घेतला. त्याऐवजी ज्या तारखेचा ८६०३२ तोडून संपेल त्या तारखेचा फुले २६५ तोडल्यावरच पुढे जायचे, असा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ संचालक राजवर्धन शिंदे, शिवाजीराजे निंबाळकर, विश्वास जगताप, सुनील भगत, शैलेश रासकर, लक्ष्मण गोफणे, ऋषी गायकवाड, किसन तांबे, हरिभाऊ भोंडवे, जितेंद्र निगडे, शांताराम कापरे, अनंत तांबे, प्रवीण कांबळे, रणजित मोरे, कमल पवार उपस्थित होते.
चर्चेत मदन काकडे, किशोर भोसले, दीपक निगडे, लालासाहेब दरेकर, उमेश मांडके, योगेश भोसले, सुरेश जेधे, संजय घाडगे, शिवाजी शेंडकर, बुवासाहेब हुंबरे बाळासाहेब राऊत, ऋतुराज काकडे, धनंजय हाके, दत्तात्रेय ढोले, विजय काकडे, दत्तात्रेय भोईटे, सोमनाथ मदने, महेश जेधे, भास्कर कदम, हंबीरराव जगताप आदींनी संचालक मंडळावर प्रश्नांची सरबत्ती केली. राजेंद्र यादव यांनी प्रास्ताविक केले.
बाळासाहेब कामथे यांनी आभार मानले.


आडसाली उसलागवडीवर मर्यादा आणण्यापेक्षा पूर्वहंगामी, सुरू, खोडवा लागवडी परवडतात हे शेतकऱ्यांना पटलं पाहिजे. फेब्रुवारीनंतर तुटणाऱ्या उसाला लागवडीवेळीच अनुदान जाहीर करावे. रोपलागवडीची नोंद घेतल्यानंतर पुढील तीस दिवसांच्या आत लागवड बंधनकारक करावी. ऊसनोंद, ऊसतोडणी डिजिटल करावी. कारखाना किमान १६० दिवस चालला तरच परवडते.
- शहाजी काकडे, माजी अध्यक्ष, सोमेश्‍वर साखर कारखाना


सभासदांनी संमती दिली तरच गेटकेन आणणार
अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप म्हणाले, की सरत्या हंगामात अंदाज चुकला हे मान्य करतो, मात्र घरावर नांगर फिरविला हे चुकीचे आहे. संपूर्ण राज्याचेच अंदाज चुकलेत. एकरी उत्पन्नात वाढ, टंचाईग्रस्त जिराईत भागातील साडेपाच लाख टन ऊस प्राधान्याने आणणे, आडसालीसोबत अन्य लागवडींना न्याय देणे याने तोडी लांबल्या. सभासदांना दिलेले अनुदान, खोडकी बिल गेटकेनधारकांना दिले जाणार नाही. आगामी हंगामात केवळ ३१ हजार एकरांच्या नोंदी असल्याने गटकेन आणावा लागेल. मात्र सभासदांनी संमती दिली तरच गेटकेन आणणार.


03540

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT