Coronavirus Sakal
पुणे

पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही निर्बंध शिथिल

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्ण दर पाच टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोना बाधित रुग्ण दर पाच टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही सोमवारपासून (ता. १६) कोरोनाबाबतचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. या निर्णयानुसार पुणे शहराप्रमाणे आता ग्रामीण भागातही सर्व दुकाने, हॉटेल, मॉल आणि बिअर बार आता रात्री दहा वाजेपर्यंत सुरू राहतील.

जिल्ह्यात ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण दर हा पाच टक्क्यांपेक्षा कमी होत नव्हता. त्यामुळे ग्रामीण भागातील दुकाने, हॉटेल आणि रेस्टॉरंट यांना दुपारी चार वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली होती. परंतु सध्या ग्रामीण भागात रुग्ण दर ४.९ टक्यांवर आला आहे. त्यामुळे आजपासून निर्बंधातून सवलत देण्यात आली आहे. तसेच, पुणे व खडकी कॅन्टोन्मेंट आणि देहू रोड कॅन्टोन्मेंट हद्दीतही निर्बंध शिथिल करण्यात आल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने जारी केले आहेत.

मॉल रात्री दहा पर्यंत सुरू राहणार असून, कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या कर्मचारी आणि ग्राहकांना मॉलमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. हॉटेल आणि दुकानांमधील कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन्ही डोस घेऊन १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला असावा.

जिम, योगा सेंटर, सलून आणि स्पा रात्री दहा वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. विवाह सोहळ्यांसाठी खुल्या प्रांगणात क्षमतेच्या ५० टक्के जास्तीत जास्त दोनशे व्यक्तींना परवानगी असेल. तर, बंदिस्त मंगल कार्यालयात ५० टक्के क्षमतेने जास्तीत जास्त शंभर व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे. चित्रपटगृहे आणि धार्मिक स्थळे बंदच राहणार आहेत. सर्वांना मास्क वापरण्यासह कोरोनाबाबत नियमावलीचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

  • सर्व दुकाने साप्ताहिक सुटी वगळता सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत सुरू

  • दुकान मालक आणि कामगारांना मास्कचा वापर अनिवार्य

  • हॉटेल, रेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने आणि फिजिकल डिस्टंसिंगचे पालन आवश्यक

  • मॉल्स रात्री दहापर्यंत खुले राहणार, परंतु दोन डोस घेतलेल्या ग्राहकांनाच प्रवेश

  • जलतरण तलाव वगळता इतर इनडोअर, आउटडोअर खेळांना परवानगी

  • सर्व धार्मिक स्थळे, चित्रपटगृहे बंद राहणार

  • विवाह सोहळ्यासाठी परवानगी मात्र व्यवस्थापक, कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेणे बंधनकारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

१०० च्या जागी ५०० तर ४०० च्या २०००... ATM मध्ये मोठी बिघाड, पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड!

Mumbai-Ahmedabad Bullet Train: देशातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याला गती; विक्रोळीत टनेल बोरिंग मशीनचा ३५० टनांचा कटरहेड यशस्वीपणे बसवला

MHADA E-Auction: म्हाडाच्या व्यावसायिक व कार्यालयीन गाळ्यांचा ई-लिलाव; २० मेपासून नोंदणी, २४ जूनला ऑनलाइन बोली

Mira Bhayandar Virar Metro: मिरा-भाईंदर ते विरार मेट्रोसाठी १७,७२४ कोटींचा नवा प्रस्ताव; मार्ग बदलून २४.९ किमी, १७ स्थानकांची योजना

Mumbai Suburban Upgrade: दादर स्थानकावर ३४ वर्षांनंतर सिग्नल यंत्रणेचा कायापालट

SCROLL FOR NEXT