सकाळ परिणाम sakal
पुणे

Pune 'सकाळ'च्या बातमीचा परिणाम! पेन्शन प्रकरणाच्या निपटाऱ्यासाठी स्थापन होणार स्वतंत्र कक्ष

पगार लेखनिकाकडून काढल्या जाणाऱ्या त्रुटींची पूर्तता करणे, त्यानंतर फाइल पुढच्या टेबलवर जाण्यासाठी वारंवार खेटे मारावे लागतात.

​ ब्रिजमोहन पाटील

Pune - पुणे महापालिकेत पेन्शनची प्रकरणे मार्गी लावण्यासाठी लाचखोरीसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांची प्रचंड अडवणूक सुरू असल्याचा प्रकार ‘सकाळ’ने चव्हाट्यावर आणला.

त्यावर आता महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पेन्शनच्या प्रकरणांचा वेगात निपटारा होण्यासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाईल. तसेच त्यासाठी ज्या प्रशासकीय सुधारणा करण्यात येतील असे आज स्पष्ट केले आहे.

पुणे महापालिकेत सेवा निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना पेन्शन सुरू करून घेण्यासाठी, शिल्लक सुट्‍ट्यांचे पैसे मिळावेत यासाठी अनेक महिने वाट पहावी लागते. तब्बल ५५४ प्रकरणे प्रलंबित आहेत.

पगार लेखनिकाकडून काढल्या जाणाऱ्या त्रुटींची पूर्तता करणे, त्यानंतर फाइल पुढच्या टेबलवर जाण्यासाठी वारंवार खेटे मारावे लागतात. त्यामध्ये या निवृत्त कर्मचाऱ्यांकडून १० हजारपासून ते १ लाखापर्यंत पैसे घेतले आहेत.

याबाबत ‘सकाळ’ने आज वृत्त प्रकाशित केले होते. त्याबाबत अनेक सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून, अधिकाऱ्यांनी आभार मानले. प्रशासनातील कर्मचाऱ्यांमध्ये याचे पडसाद उमटले आहेत.

पेन्शनसाठी लाचखोरी होत असल्याचे आयुक्तांना विचारले असता त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. विक्रम कुमार म्हणाले, ‘‘पुणे महापालिकेतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मानच झाला पाहिजे, त्यांना प्रत्येक कार्यालयात चांगली वागणूक देणे कर्तव्य आहे.

कर्मचाऱ्यांना लगेच पेन्शन मिळण्यासाठी ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्रशासकीय सुधारणा केली जाईल. त्यासाठी लवकरच स्वतंत्र कक्ष स्थापन केला जाईल. त्यामुळे ही प्रकरणांचा पारदर्शक व वेगात निपटारा होईल.

बिगाऱ्यांना मुळ जागी पाठवणार

महापालिकेच्या विविध विभागांसह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये पेन्शनची कामे करण्यासाठी बिगाऱ्यांकडे जबाबदारी दिली आहे. ही कामे लिपिक पदावरील व्यक्तीने केली पाहिजेत, हे अधिकाऱ्यांना माहिती असूनही वर्षानुवर्षे बिगाऱ्यांकडून ही कामे करून घेतली जात आहेत.

त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांनी अडवणूक होत आहे. आरोग्य विभागातील बिगाऱ्याला एक लाखाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आल्याने हा प्रकार समोर आला. त्याबाबत आयुक्त म्हणाले, ‘‘लिपीकाचे कोणतेही काम बिगाऱ्याला देऊ नये. त्यांना त्यांच्या नियुक्तीच्या मुळ जागी पाठवावे असे आदेश दिले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola : गावच्या पाण्याच्या टाकीतून थेट घराला आणि शेतीला पाणी नेलं, १५ वर्षे पाणीचोरी; ठाकरेंच्या नेत्यावर गुन्हा दाखल

IND vs SA: विराट कोहली नाही, तर 'या' खेळाडूला भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये मिळाले Impact Player चे मेडल; BCCI ने शेअर केला Video

Latest Marathi News Live Update : लातूरमध्ये भरदिवसा एकावर हल्ला! निलंगा शहरात जगदीश लोभेवर कत्तीने वार,गंभीर जखमी

IndiGo Crisis : इंडिगोचे संकट अजून संपलेलं नाही ! दिल्लीतून सहाव्या दिवशी १०० उड्डाणे रद्द, प्रवाशांचा मनस्ताप

राज्यात घोटाळेबाजांचं आणि गुंडांचं राज्य, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; मविआची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT