june-sanghvi
june-sanghvi 
पुणे

सकाळ बातमीचा परिणाम-सांगवी दापोडी पुल रस्त्याचे अखेर डांबरीकरण

रमेश मोरे

जुनी सांगवी - जुनी सांगवी - दापोडीला जोडणा-या पवना नदीवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलावर डांबराचा थर निघाल्याने खड्डे पडले होते. दापोडी, पिंपरी, पुण्याकडे  जाण्यासाठी या पुलाचा रहदारीसाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो. गेल्या काही महिन्यांपासुन येथील डांबराचा थर ठिकठिकाणी निघुन गेल्याने पुलावर छोटे खड्डे पडले होते. अनेकदा खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाक्या घसरण्याचे प्रकार येथे वारंवार घडत होते. तर खड्ड्यांमुळे वहातुक कोंडी होवुन रहदारीस अडथळा येत होता. 

सकाळी व रात्री दापोडी सांगवी परिसरातील स्कुलबस, पिंपरी भोसरीकडे कामाला जाणा-या मंडळींची रहदारी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर असते. तर सांगवीतुन दापोडी येथे शाळेसाठी पायी जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पुलाच्या डाव्या वळणावर वसंतदादा पुतळा महानगर बसस्थानक आहे. पुणे शहर व विविध भागात येथुन पन्नासच्यावर बसगाड्यांच्या फे-या होतात. खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकी घसरून अनेकदा येथे किरकोळ अपघातही यापुर्वी घडले होते. पुलाच्या दोन्ही बाजुनी उतार रस्ता असल्याने वहाने वेगात असतात यातच डांबराचा थर निघाल्याने रस्ता खड्डेमय होवुन निसरडा झाला होता. जेष्ठ नागरीक, विद्यार्थी, पादचारी यांना येथुन रहदारीसाठी कसरत करावी लागत होती. खड्ड्यांच्या त्रासाबरोबरच वेगात येणारी वाहने यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला होता. येथील पुलरस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरीकांमधुन होत होती. सकाळ मधुन याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. अखेर पुलावर  डांबरीकरण करण्यात आल्याने नागरीकांमधुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT