पुणे

निवृत्त कॅप्टनला अटक

CD

निवृत्त कॅप्टनला
तमिळनाडूत अटक

गोपनीय लष्करी माहिती अज्ञात महिलेला दिल्याचा संशय

वेल्लोर (तमिळनाडू), ता. २५ (वृत्तसंस्था) : लष्कराची गोपनीय माहिती आणि लष्करी उपकरणांशी संबंधित तपशील ‘व्हॉट्सॲप’द्वारे एका अज्ञात महिलेला पुरवल्याच्या आरोपावरून तमिळनाडूतील वेल्लोर येथे निवृत्त लष्करातील कॅप्टनला अटक करण्यात आली. बाबू (वय ५२) असे आरोपीचे नाव असून, त्याने गेल्या वर्षभरात लष्कराशी संबंधित संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय आहे. कानियांबाडी पोलिसांनी ही माहिती दिली.

बाबू हा वेल्लोर जिल्ह्यातील कानियांबाडी जवळच्या कीझवल्लम गावचा रहिवासी आहे. त्याने लष्करात २८ वर्षे सेवा बजावली होती. गेल्या वर्षी तो लष्कराच्या उपकरण विभागातून कॅप्टनपदावरून निवृत्त झाला होता. त्यानंतर तो आपल्या मूळ गावी स्थायिक झाला. प्राथमिक तपासानुसार, सुमारे वर्षभरापूर्वी एका अज्ञात महिलेने ‘व्हॉट्सॲप’वरून बाबूशी संपर्क साधला. सुरुवातीला अश्लील स्वरूपाच्या संभाषणांतून तिने त्याच्याशी जवळीक निर्माण केली. त्यानंतर ती लष्कराशी संबंधित विविध माहिती विचारू लागली. बाबूने तिला ही माहिती पुरवल्याचा आरोप आहे. काही तपशील स्वतःला माहीत नसल्यास बाबू लष्करी कार्यालयांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून माहिती मिळवत असे आणि ती संबंधित महिलेला पाठवत असे, अशी माहिती तपासात समोर आली आहे. त्याने लष्करी उपकरणांसह अन्य संवेदनशील तपशीलही उघड केल्याचा संशय आहे.

गुप्तचर यंत्रणांकडून चौकशी

बाबूच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने लष्करी अधिकाऱ्यांनी केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने त्याची चौकशी केली. या चौकशीनंतर त्याला दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर शनिवारी रात्री त्याला वेल्लोर ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरू आहे. बाबूशी संपर्क साधणाऱ्या महिलेची ओळख पटवण्याचा प्रयत्न तपास पथक करत आहे. संबंधित ‘व्हॉट्सॲप’ खाते कोण चालवत होते, तसेच यामागे परदेशी नागरिक किंवा संस्थांचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: हरमनप्रीत-दीप्तीने रचला शतकांचा डाव! भारताने झिम्बाब्वेसमोर ठेवलं मोठं लक्ष्य, दुसऱ्या डावात थरार सुरू

Mohol Crime New: मोहोळमध्ये ८५ वर्षीय वृद्धेला गंडा; दूध देण्याचे आमिष दाखवून ५० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

Dilip Walse Patil: कर्जतमधील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही; दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण

Solapur Crime: मेहुणीला शिक्षणासाठी घरी आणलं, पत्नी असताना तिच्यासोबत लग्न केलं अन्...; सासऱ्याने घडवला रक्तरंजित थरार

VIDEO : मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य; PM मोदींबद्दल बोलताच कार्यक्रमात गोंधळ, काँग्रेस कार्यकर्त्यांकडून एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT