PNE26W63080
अहिल्यानगर ः पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा स्नेहमेळावा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
सेवानिवृत्तांच्या स्नेहमेळाव्यात
सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
अहिल्यानगर, ता. ३१ ः पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा तिसरा स्नेहमेळावा नुकताच शहरात मोठ्या उत्साहात पार पडला. सेवानिवृत्तिनंतरही जपलेली मैत्री, जुन्या आठवणी, परस्परांबद्दलचा जिव्हाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद, यामुळे हा स्नेहमेळावा अविस्मरणीय ठरविला.
शहरात हा स्नेहमेळावा रंगला होता. शरद कुलकर्णी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आसाराम सोनसळे आणि लक्ष्मण रासकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष तळेकर, उपाध्यक्ष विलास पेद्राम आणि माजी खजिनदार सुभाष मुनोत आदी उपस्थित होते. शासनाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या महा उपलब्धी योजनेबाबत जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी डॉ. मुकुंद शिंदे आणि गणेश नरोटे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सेवानिवृत्तांनी अभंग, कविता, गाणी सादर केली. किसन लांडे, बाबासाहेब कराळे, मारुती औरंगे, गोरख कुंभार, दत्तात्रय पानसरे, सुरेश आरवडे, दुर्गादास पुंड, अरविंद काळे, जनार्दन सिंदीकर, रघुनाथ वाबळे, रमेश कराळे, सुनील सोयगावकर, बबनराव भोकरे, यशवंत धोत्रे, विश्वनाथ शिंदे, मुरलीधर ठोंबरे, अशोक फुले, दत्तात्रय जगताप, संपत साठे, अमीन इनामदार, नंदकिशोर माडीवाले, शंकर जाधव, यासीन शेख आदींनी मेळाव्याच्या यशस्विततेसाठी परिश्रम घेतले. रमेश देशमुख यांनी स्वागत केले. दुर्गादास पुंड यांनी प्रास्ताविक केले. सयाजीराव वाव्हळ यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर चिकटे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.