निवृत्त व्यवस्थापकाची
७५ लाखांनी फसवणूक
शेअर बाजारात अधिक नफ्याचे आमिष
सकाळ वृत्तसेवा
नागपूर, ता.१९ : शेअर बाजारातील गुंतवणुकीतून मोठा नफा देण्याचे आमिष दाखवत शहरातील एका ६५ वर्षीय बँकेच्या निवृत्त व्यवस्थापकाची ७५ लाख २१ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी शहर सायबर पोलिस ठाण्यात दोन सायबर गुन्हेगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अनन्या कुळकर्णी, गुल टेकचंदानी आणि अन्य खातेदार अशी आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बेलतरोडी रहिवासी तक्रारदाराला १२ जून २०२६ रोजी एका अनोळखी व्हॉट्सॲप क्रमांकावरून संदेश आला. त्यात शेअर बाजारात रस आहे का? अशी विचारणा करून ‘१८८ एलिट ग्रोथ फोरम’ या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. ग्रुपची ॲडमिन अनन्या कुलकर्णी आणि मुख्य ॲडमिन गुल टेकचंदानी होते. अनन्याने त्यांना ‘फिनसोल सिक्युरिटी प्रा.लि.’ सेबी नोंदणीकृत असल्याचे सांगून त्याचे बनावट पत्र व्हॉट्सॲपवर पाठविले. त्यानुसार तक्रारदाराने १५ जून ते दोन जुलै २०२६ या कालावधीत विविध बनावट कंपन्यांच्या खात्यांवर एकूण ७५ लाख २१ हजार रुपये वळविले. सात जुलै २०२६ रोजी त्यांच्या ॲपमधील खात्यात चार कोटी ६५ लाख रुपयांहून अधिकचा नफा दिसल्याने तो काढण्यासाठी त्यांनी अर्ज केला, तेव्हा आरोपींनी त्यांना पाच टक्के सेवाकर भरण्यास सांगितले. सेवाकर न भरल्यास खाते गोठविण्याची धमकी दिली. त्यावरून फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.