पुणे

बावड्यात २१ सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान

CD

बावडा, ता. ७ : शिक्षक दिनानिमित्त बावडा (ता. इंदापूर) येथील प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमधून सेवानिवृत्त झालेल्या २१ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. किसान सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स. म. शं. मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक महादेव घाडगे होते. आविष्कार फार्मर क्लब, किसान सार्वजनिक वाचनालय व शेतकरी संघर्ष समिती, बावडा यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये इंदापूर शिक्षण प्रसारक मंडळ, श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी, भैरवनाथ शिक्षण मंडळ, रयत शिक्षण संस्था तसेच निमसाखर व निरनिमगाव परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये सेवा बजावलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी किसान सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पंडितराव पाटील म्हणाले की, ‘‘प्रत्यक्ष सेवेत असताना शिक्षक दिनी कार्यरत शिक्षकांचा शासन, संस्था, पालक व विद्यार्थ्यांकडून सन्मान केला जातो. मात्र, सेवानिवृत्तीनंतर शिक्षक या सन्मानाच्या प्रक्रियेपासून दूर राहतात. त्यांच्या योगदानाची जाणीव ठेवून वाचनालयाने पुढाकार घेत २१ सेवानिवृत्त शिक्षकांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला.’’ या प्रसंगी विद्यासागर घोगरे, धैर्यशील पाटील, उमेश पाटील, विजय काटकर, विशाल घाडगे, अशोक चव्हाण व लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. पंडित पाटील, सुरेश शिंदे, दिलीप पाटील, बाळासाहेब घोगरे, गोरख गायकवाड, अशोक आगलावे, दत्तात्रेय गायकवाड आदींचा सत्कार या वेळी करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी ३ महिन्यांचं वेतन दिलं पूरग्रस्तांसाठी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत पाठवले पैसे

'चला हवा येऊ द्या'मध्ये तुकाराम मुंढेंचं पात्र साकारण्यास निलेश साबळेंचा नकार; कारण काय?

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

SCROLL FOR NEXT