पुणे

यवत येथे ७ मार्चला महाराजस्व शिबिर

CD

दौंड, ता. ३ : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांतर्गत दौंड तालुक्यात ७ मार्चपासून दोन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. दौंड तालुक्याचे तहसीलदार अरुण शेलार यांनी याबाबत माहिती दिली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे ७ मार्च रोजी यवत (ता. दौंड) येथील श्री काळभैरव मंदिर परिसरातील पालखी सभामंडप येथे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर १४ मार्च रोजी पाटस येथे शिबिराचे आयोजन होणार आहे.
महसूल विभागांतर्गत सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकालात काढण्यासाठी हे शिबिर घेतले जात आहे. महसूल प्रशासन गतिमान करण्यासाठी दौंड तालुक्यात मंडल स्तरावर ही शिबिरे घेतले जात आहेत.
शिबिरात प्रलंबित फेरफार निकाली काढणे, जिवंत सातबारा मोहीम, शालेय दाखल्यांचे वितरण, विशेष अर्थसाह्य योजनांचा लाभ, पीएम किसान योजना, ॲग्रिस्टॅक योजना, सातबारा उतारे अद्ययावत करणे, नवीन अकृषक धोरणाची माहिती देणे, भोगवटा क्रमांक - २च्या जमिनी नियमानुसार वर्ग -१ करण्याबाबत कार्यवाही प्रक्रिया, तुकडेबंदी धोरणाबाबत कार्यवाही प्रक्रिया आदी कामे प्रामुख्याने केली जाणार आहेत. ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी यांनी शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार शेलार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणमध्ये शाळा बनली कब्रस्तान! JCBने १६० मुलींच्या मृतदेहाचे दफन; अमेरिका म्हणते, जाणीवपूर्वक हल्ला केला नाही

Sanju Samson: संजू सॅमसनवर एका सामन्याची बंदी, IND vs ENG उपांत्य फेरीच्या सामन्याला मुकणार, ICC ची कारवाई? जाणून घ्या नेमकं सत्य

Nagpur News : इराण-इस्रायल युद्धाचा नागपूरकरांना फटका! बेसा येथील उपलांचीवार कुटुंबासह अनेक नागरिक अबुधाबीत अडकले; विमानसेवा रद्द झाल्याने परतीचा प्रवास थांबला

Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण; सुरक्षारक्षकांचा माज कॅमेऱ्यात कैद!

Chandra Grahan: गरोदर महिलांवर ग्रहणाचा खरंच दुष्परिणाम होतो का? अंनिसने केला खुलासा; वाचा सत्य काय...

SCROLL FOR NEXT