Satbara
Satbara Sakal
पुणे

Pune : मोफत सातबारा वितरणाची घोषणा हवेतच; महसुल विभागाचे कागदी घोडे

निलेश बोरुडे

किरकटवाडी: शेतकऱ्यांना मोफत डिजिटल सातबारा उपलब्ध करुन देण्याची महसूल विभागाची योजना केवळ दिखावा ठरली असून पश्चिम हवेलीतील शेतकरी अजूनही या योजनेची प्रतीक्षा करत आहेत. मोठा गाजावाजा करत सुरू झालेल्या या उपक्रमाचे प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचविल्याचे चित्र दिसून येत आहे.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' या उपक्रमांतर्गत शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती पासून 9 ऑक्टोबर पर्यंत हवेली तालुक्यातील प्रत्येक महसुली सजाच्या ठिकाणी मोफत डिजिटल सातबारा उपलब्ध होणार असल्याची माहिती हवेली तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी दिली होती. 2 ऑक्टोबर रोजी आगळंबे येथे मोठा गाजावाजा करत या उपक्रमाची सुरुवात झाली. मात्र, गोऱ्हे बुद्रुक येथील ठराविक शेतकरी आणि आगळंबे येथील काही शेतकरी वगळता इतर गावांतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला नाही.

नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी, सणसनगर, गोऱ्हे बुद्रुक, डोणजे, गोऱ्हे खुर्द, खानापूर, मणेरवाडी, मोगरवाडी, मालखेड, आंबी, सोनापूर, कुडजे, मांडवी, सांगरुण, बहुली व परिसरातील इतर गावांतील शेतकरी मोफत सातबारा कधी मिळणार? याची वाट पाहत आहेत. संबंधित कामगार तलाठ्यांना याबाबत विचारणा केली असता काहींनी बोलणे टाळले तर कहींनी तहसील कार्यालयाकडून झेरॉक्स आल्यानंतर वाटप करणार असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला आहे.

"मोफत सातबारा मिळणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर तलाठी कार्यालयाशी संपर्क केला होता परंतु त्यांनी मोफत सातबारा आगळंबे येथे मिळणार असल्याचे सांगितले. अंतर लांब असल्याने सातबारा घेण्यासाठी जाऊ शकलो नाही."

- अंकुश हगवणे, शेतकरी, किरकटवाडी.

"गावात मोफत सातबारा वाटप करण्यात आले नाही. मोफत सातबारा मिळणार अशी चर्चा ऐकली होती परंतु प्रत्यक्षात असे काहीही झाले नाही."

- शुभम पवळे, शेतकरी, सोनापूर.

" शेतकऱ्यांना व इतर सर्व नागरिकांना सोईस्कर होण्यासाठी प्रत्येक गावात मोफत सातबारा वितरण व्हायला हवे."

- समीर पायगुडे, माजी सरपंच,कुडजे.

"सर्व्हर डाउन झाल्याने सातबारे डाऊनलोड करण्यासाठी वेळ लागला. सध्या सर्व सातबारे प्रिंट काढून तयार आहेत परंतु तलाठ्यांचा संप सुरू असल्याने वितरण करणे शक्य नाही. संप मिटल्यानंतर प्रत्येक गावात मोफत डिजिटल सातबारा वाटप करण्यात येईल."

- तृप्ती कोलते-पाटील, तहसीलदार, हवेली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT