Illegal-Hoarding sakal
पुणे

Pune News : होर्डिंगच्या स्ट्रक्टरल ऑडिटीची उलट तपासणी

अधिकृत होर्डिंग सुरक्षीत असल्याचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल होर्डिंग व्यावसायिकांनी महापालिकेला सादर केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - अधिकृत होर्डिंग सुरक्षीत असल्याचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल होर्डिंग व्यावसायिकांनी महापालिकेला सादर केला आहे. पण ते खरेच सुरक्षीत आहेत की नाही याची उलट तपासणी आता महापालिका करणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या पॅनेलवरील पाच स्ट्रक्चरल इंजिनिअरकडून हे काम करून घेतले जाणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत अवकाळी पावसात अनधिकृत होर्डिंग कोसळून पाच जणांचा बळी गेला. त्यापार्श्‍वभूमीवर अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी पुणे शहरात होर्डिंग पडून जिवीतहानी, वित्तहानी होऊ नये, वाहतुकीचा खोळंबा होऊ नये यासाठी व्यावसायिकांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

जे व्यावसायिक अहवाल सादर करणार नाहीत, त्यांचे होर्डिंग अनधिकृत समजून त्यांना नोटीस देऊन होर्डिंग काढून टाकण्याची कार्यवाही सुरू करावी असेही आदेशात नमूद केले होते. हे आदेश काढून दोन महिने झाले तरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त, परिमंडळ उपायुक्तांकडून स्ट्रक्चरल ऑडिचे अहवाल व कारवाई केल्याचा अहवाल सादर न केल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. दरम्यान, धोकादायक होर्डिंग संदर्भात ‘सकाळ’ वृत्त देऊन याचा पाठपुरावा केला होता.

दरम्यान आता आकाश चिन्ह विभागाकडे सुमारे १६०० होर्डिंगच्या स्ट्रक्चरल ऑडिटची माहिती सादर झाली आहे. आता हे ऑडिट रिपोर्ट खरे आहे की खोटे याची उलट तपासणी महापालिका करणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या पॅनेलवरील पाच स्ट्रक्चरल इंजिनिअरकडे हे काम दिले जाणार आहे, असे आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Latest Marathi News Update : देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार असल्याच्या चर्चेला उधाण, बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT