ce.jpg 
पुणे

केंद्रीय पथकाचा पुण्यासाठी आदेश; काय आहे तो वाचा सविस्तर

अनिल सावळे

पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामधील निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जावी. तसेच, मृत्यूदर कमी करण्यावर लक्ष केंद्रित करावे, अशा स्वरूपाचे आदेश केंद्रीय पथकाचे प्रमुख तथा केंद्रीय गृहनिर्माण मंत्रालयाचे संयुक्त सचिव कुणाल कुमार यांनी दिले. कोरोना प्रतिबंधासाठी दाट लोकवस्तीच्या क्षेत्रात स्वयंसेवकांची मदत घ्यावी. 

पुणे शहर आणि जिल्ह्यातील कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी केंद्रीय स्तरावरील पथक पुणे जिल्ह्यात सोमवारी सकाळी दाखल झाले. या पथकाने शहरातील प्रतिबंधित क्षेत्र, रुग्णालये आणि पुणे महापालिका येथे भेट देवून पाहणी केली. यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याचा आढावा घेतला.

या वेळी त्यांच्यासमवेत 'एम्स' नागपूर येथील डॉ. अरविंद कुशवाह व डॉ. सितीकांता बॅनर्जी उपस्थित होते. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भूजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर आदी या वेळी उपस्थित होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सचिव कुणाल कुमार म्हणाले, जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजना समाधानकारक आहेत. झोपडपट्टी अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे. ज्येष्ठ नागरिक तसेच इतर आजार असलेल्या व्यक्तींची तातडीने तपासणी होणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाब तसेच रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य आहे का, तसेच त्यांचा औषधोपचार व्यवस्थित सुरू आहे, याबाबत कायम आढावा घेण्यात यावा. याकामी त्याच परिसरातील वॉर्डनिहाय स्वयंसेवकांची नेमणूक करावी, जेणेकरून या कामात गती येईल. पल्स ऑक्सीमीटरचा वापर करण्यात यावा, संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याबरोबरच अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यात यावा. 

शहरात कोणत्या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहेत, याचे डॅशबोर्ड तयार करण्यात आले आहे. या डॅशबोर्डच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना बेड उपलब्धतेची माहिती मिळणार आहे. बेड व्यवस्थापन यंत्रणा तसेच रुग्णवाहिका व्यवस्थापन यंत्रणा अत्यंत गतिमान करावी, अशा सूचना पथकातील अधिकाऱ्यांनी केल्या. जिल्ह्यातील रुग्णसंख्या, परिसरनिहाय रुग्ण, रुग्णांमध्ये असलेले विविध आजार, रुग्णांचे वर्गीकरण, कोरोनामुळे मृत्यू झालेले रुग्ण त्याची कारणे, प्रतिबंधित क्षेत्राचा तपशील, घरोघरी झालेले सर्व्हेक्षण, कोविड सेंटर, रुग्णालयातील स्थितीचा बैठकीत आढावा घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Nagpur Ganesh Visarjan: ड्रोनमधून ठेवणार गणेश विसर्जनावर नजर;६, हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त; १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT