पुणे

ईन्ट्रो

CD

शहर बससाठी निर्धाराची वज्रमूठ

सातारकरांच्‍या वेदनेवर ‘सकाळ’मुळे फुंकर; व्‍यक्‍त झाल्‍या उत्स्फूर्त प्रतिक्रिया

सातारा, ता. २२ : दोन दशके बंद राहिलेली शहर बससेवा पुन्‍हा एकदा सातारकरांच्‍या सोयीसाठी सुरू व्‍हावी, रस्‍त्‍यांवरील वाहनांच्‍या वाढत्‍या संख्‍येला मर्यादा यावी आणि शहरांतर्गत प्रवासासाठी दररोज बसणारा भुर्दंड कमी व्‍हावा, अशा व्‍यापक भूमिकेतून ‘सकाळ’ने ‘धावलीच पाहिजे सिटीबस’ ही लेखमाला सुरू करत, सातारकरांच्‍या अव्‍यक्‍त वेदनेवर फुंकर घातली. त्‍याचे सातारकरांकडून उत्स्फूर्तपणे स्‍वागत तर झालेच; पण शहर बसच्‍या मागणीसाठी निर्धाराची वज्रमूठ आवळण्‍यासही आपल्‍या प्रतिक्रियांतून तयारी दर्शवली आहे.

......................................

प्रतिक्रिया
......................................

सिटीबस बंद असल्याने रिक्षाचालकांकडून मनमानी भाडे आकारले जात आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून त्यावर प्रभावी कारवाई होत नसल्याची अनेकांची भावना आहे. त्यामुळे तातडीने सिटी बस सुरू करून रिक्षांना मीटरप्रमाणे भाडे आकारण्याची सक्ती करावी. ‘सकाळ’ने हा प्रश्न एक काळाची गरज म्‍हणून मांडल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन.

- सतीश भोसले, गोरखपूर
.........

पूर्वी पोवई नाका येथील असलेला बसथांबा आता बगाडे स्टॉपकडे हलवल्याने ज्येष्ठ नागरिकांना सुमारे २०० मीटर पायपीट करावी लागते. राजपथावरील बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होते. सायंकाळनंतर बसच मिळत नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय आहे. प्रशासनाने शहर बससेवा, विशेषतः मिनी बस, तातडीने सुरू करावी.
- अशोक कानेटकर,
अध्यक्ष, उमेद ज्येष्ठ नागरिक संघ, शाहू चौक
..........................................

शाहूपुरी- आंबेदरे परिसरातील विद्यार्थ्यांना पोवई नाका ते जिल्हा परिषद परिसरात जाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागते. रिक्षाचा खर्च पालकांना परवडत नाही. त्यामुळे शाळा- महाविद्यालयांच्या वेळेनुसार आंबेदरे ते जिल्हा परिषद किंवा गोडोली मार्गावर सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी दोन फेऱ्या सुरू कराव्यात.
- सदानंद माळी, शाहूपुरी
..............................................

एकेकाळी सिटी बस ही साताऱ्याची शान होती. आता उपनगरात जाण्यासाठी नागरिकांना मोठा खर्च करावा लागतो. विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी शहर बससेवा अत्यंत गरजेची आहे. सातारा शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी सिटी बससेवा पुन्हा सुरू करावी.
- जनार्दन अनपट, विलासपूर
.....................................................


शिवराज चौक, गोडोली, गोळीबार मैदान, रामराव पवारनगर, तसेच कोडोली, देगाव, महागाव, मुथा फौंड्री आणि बजाज जुन्या एमआयडीसीपर्यंत बसफेऱ्या सुरू कराव्यात. या मार्गांवरील बससेवेचा एमआयडीसीत कामासाठी ये- जा करणाऱ्या नागरिकांना मोठा फायदा होईल. रिक्षाचालक मीटरऐवजी मनमानी भाडे आकारत असल्याने बससेवा अत्यावश्यक आहे.
- उत्तम नलावडे, कोडोली
........
उपनगरातून शहरात येण्यासाठी रिक्षा चालकांकडून मीटरप्रमाणे भाडे न आकारता मनमानी पैसे घेतले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदारांची गैरसोय लक्षात घेऊन उपनगरांपर्यंत नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात.
- पौर्णिमा कांबळे
.....................
----------------------------------------------------------------------------

----------डबल झाली आहे...................
शहरालगतच्या उपनगरांची वाढती लोकसंख्या आणि पार्किंगची समस्या लक्षात घेता नगरपालिकेने प्रायोगिक तत्त्वावर मिनी इलेक्ट्रिक बससेवा सुरू करावी. सज्जनगड-परळी, लिंब, एमआयडीसी-देगाव, शाहूपुरी-आंबेदरे, क्षेत्रमाहुली आणि शेंद्रे मार्गांवर प्रायोगिक तत्त्वावर बस चालवाव्यात. रिक्षांच्या वाढत्या भाड्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणे आवश्यक आहे.
- धनंजय कदम, देवी कॉलनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDAची राज्यभरात धडाकेबाज कारवाई, १३ आस्थापनांचे परवाने निलंबित

Mumbai Indians : हार्दिक पांड्याची चर्चा सुरू असताना MI ची मोठी घोषणा; राजस्थान रॉयल्सचा माणूस फोडला, वैभव सूर्यवंशीला...

प्राजक्ता माळीने अचानक थेट खांद्यापर्यंत कापले केस, पण का? पोस्ट करत सांगितलं कारण

Marathi News Live Updates : 'छात्रो की गुंज' कार्यक्रमासाठी राहुल गांधी पुण्यात दाखल

Navi Mumbai News: नवी मुंबईच्या दळणवळणात होणार क्रांती ! कोस्टल रोडसह मेट्रो मार्गांच्या डीपीआरवर चर्चा; मात्र विषय स्थगित

SCROLL FOR NEXT