पुणे

अग्रलेख...हळद

CD

फिका रंग हळदीचा!
..........................
एखादे पीक शेतकऱ्यांनी स्वतःहून स्वीकारले, लागवड क्षेत्रात वाढ केली, पर्यायाने उत्पादनही वाढविले. परंतु वाढीव उत्पादनाच्या आनुषंगिक विक्री-मूल्यसाखळी विकास झाला नाही तर त्या पिकाच्या क्षेत्रात झपाट्याने घटही होते, हेच हळद या पिकाने दाखवून दिले आहे.
..........................
कीड-रोगांचा कमी प्रादुर्भाव, वन्य प्राण्यांचा कमी त्रास, हमखास उत्पादन, बऱ्यापैकी दर यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना हळद हे पीक इतर पारंपरिक पिकांच्या तुलनेत आश्वासक वाटत होते. त्यामुळे राज्यात हळदीचे क्षेत्र वाढत गेले. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातही या पिकाचा विस्तार बऱ्यापैकी झाला. परंतु मागील दोन-तीन वर्षांपासून हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल जरा कमीच दिसून येतो. त्याचे कारण म्हणजे लागवडीपासून ते प्रक्रिया, विक्रीपर्यंत या पिकामध्ये अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. या वर्षी सध्याचे वाढते तापमान आणि कमी पावसाचा अंदाज यामुळे शेतकऱ्यांची फारसी पसंती हळद लागवडीला दिसत नाही. हळदीसाठी प्रसिद्ध सांगलीच्या बाजार समितीत गेल्या वर्षी आतापर्यंत सहा हजार टन हळद बियाण्याची विक्री झाली होती. या वर्षी मात्र मे मध्यापर्यंत १५०० टन बियाणे विक्रीस दाखल झाले. आपल्याकडे हळदीचे बियाणे तमिळनाडू मधून येते. मात्र हळद बियाण्याची मागणी मंदावल्याने तेथील शेतकऱ्यांनी त्यावर प्रक्रिया करून विक्रीस प्राधान्य दिल्याने बियाण्याचा तुडवडा जाणवत आहे. सांगलीचे व्यापारी हळद बियाण्यासाठी तमिळनाडून आठ दिवस ठाण मांडून बसले तरी त्यांना ते उपलब्ध होत नाही. बियाण्याअभावी देखील या वर्षी हळद लागवडीला राज्यात फटका बसू शकतो.

राज्यात हळद लागवडीबाबत बोलायचे झाले तर सेलम, वायगाव, राजापुरी अशा काही जाती सोडल्या, तर फारसे पर्याय शेतकऱ्यांकडे नाहीत. प्रचलित जातींचे पण शुद्ध, खात्रीशीर बेणे बहुतांश शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपलब्ध होत नाही. हळदीचे बियाणे शेतकरी ते शेतकरी अशीही विक्री अधिक होते. देशात ५३ हून अधिक हळदीच्या जातींची लागवड होते. त्यातील काही जाती कमी कालावधीच्या, अधिक उत्पादनक्षम आणि कुरकुमीनचे प्रमाणही अधिक असलेल्या आहेत. अशा जातींचे दर्जेदार बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजेत. वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या वतीने २०२४ मध्ये प्रथमच सेलम जातीच्या हळदीच्या रोपांची निर्मिती केली गेली. पुढील काळात शेतकऱ्यांना लागवड योग्य रोपांची थेट विक्री केली जाणार असल्याने अनेक अडचणींवर शेतकऱ्यांना मात करता येणार असल्याचे सांगितले गेले. परंतु पुढे त्यावरही फारसे काम झालेले दिसत नाही. हळदीमध्ये उत्पादन वाढीसाठी प्रगत लागवड तंत्र (बेड पद्धत) आले आहे. परंतु अनेक शेतकरी या तंत्राचा अवलंब करीत नाहीत. हळदीची काढणी, काढलेली हळद गोळा करणे हे काम या परिसरात सध्यातरी मजुरांकडूनच केले जाते. हळद काढणी, गोळा करणे यासाठी उत्पादकांना यंत्रे-अवजारे उपलब्ध झाले पाहिजेत. हळद शिजविल्यानंतर वाळविण्यासाठी बराच कालावधी लागतो. हळद शिजविताना, वाळविताना अवकाळी पाऊस येऊन उत्पादकांचे नुकसान वाढत आहे. अशावेळी कच्च्या हळदीवरच प्रक्रियेचे तंत्र खासकरून तैवान, डेन्मार्क या देशांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये कुरकुमीनचे प्रमाण पण अधिक राखले जाते. हे तंत्र आपल्या देशातील शेतकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजे. हळदीच्या हळकुंडापासून ते क्रीम्स, खाद्यान्ने व औषधांपर्यंतच्या मूल्यसाखळ्या विकसित होणे गरजेच्या आहेत. हळद निर्यातीतही आपला वाटा मोठा आहे. भारतातून प्रामुख्याने कच्च्या स्वरूपातील हळद (हळकुंड) निर्यात होते. हळदीचे मूल्यवर्धन करून उत्पादनांची निर्यात करणे ही आपली पुढची दिशा असायला हवी. अशा काही उपायांनी राज्यातच नव्हे तर देशात हळदीचे क्षेत्र वाढेल, उत्पादकांना चांगला दर मिळून पुन्हा हे पीक आश्वासक वाटू लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

'मला रक्ताच्या उलट्या…' प्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोटामुळे सिनेसृष्टीतून ब्रेक, म्हणाला...'काळी जादू अन्..'

SCROLL FOR NEXT