पुणे

बंद नळयोजना १५ दिवसांत सुरु करा

CD

बंद नळ पाणीपुरवठा योजना
१५ दिवसांत सुरू करा

दुष्काळ निवारण उपसमितीच्या बैठकीत मंत्री बावनकुळे यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी टँकर हा पाणीपुरवठ्याचा शेवटचा पर्याय आहे. त्यापूर्वी बंद पडलेल्या नळ पाणीपुरवठा योजना १५ दिवसांत पूर्ववत सुरू कराव्यात. तसेच चारा टंचाई आणि पाणी नियोजनासाठी तातडीने विशेष ‘एसओपी’ (मानक कार्यपद्धती) तयार करावी, असे निर्देश दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
सह्याद्री अतिथिगृह येथे बुधवारी (ता.१४) बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ निवारण उपसमितीची उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला उपसमितीतील ११ सदस्य मंत्री आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
बावनकुळे यांनी राज्यातील पाणी परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यभरातील पाणीपुरवठा योजनांची सुमारे तीन हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यावरील दंड व व्याज माफ करून मुद्दल टप्प्याटप्प्याने भरण्यासाठी ‘वन टाइम सेटलमेंट’ योजना आणण्याबाबत त्यांनी सूचना केल्या. तसेच वीजपुरवठा सुरळीत करून ७५ टक्के काम पूर्ण झालेल्या; मात्र निधीअभावी उर्वरित २५ टक्के काम अपूर्ण राहिलेल्या योजना तातडीने पूर्ण कराव्यात. या योजना पुढील १५ दिवसांत सुरू करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय १५ व्या आणि १६ व्या वित्त आयोगाच्या निधीतून चालू वीजबिले भरण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

चारा टंचाईवर मात करण्यासाठी
‘चारा बँक’ आणि एसओपी
राज्यात चारा टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने ‘चारा बँक’ स्थापन करावी आणि चारा नियोजनासाठी एसओपी तयार करावी. ज्या जिल्ह्यांत अतिरिक्त चारा उपलब्ध आहे, तेथून लगतच्या टंचाईग्रस्त जिल्ह्यांना चारा पुरवठा केला जाईल. ६२ कोटी रुपयांच्या निधीतून चारा बियाणे पुरविण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत पाणी उपलब्ध आहे, त्यांना बियाणे देऊन चारा उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाईल. तसेच शासकीय संस्थांमार्फत हमीभावाने चारा खरेदी केला जाईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व आकडेवारी संकलित करणार
राज्यातील ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ निवारणाचा तिसरा टप्पा राबविण्यात येत आहे. येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व आकडेवारी संकलित केली जाईल. त्यानंतर पुढील आठवड्यात राज्यातील दुष्काळाची संपूर्ण आणि स्पष्ट स्थिती समोर येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

सीएसआर आणि डीपीडीसी निधीचा वापर
बैठकीत विविध लोकप्रतिनिधींनी महत्त्वाच्या सूचना मांडल्या. मोठ्या कंपन्यांचा सीएसआर (CSR) निधी तसेच जिल्हा नियोजन व विकास समितीचा (डीपीसी) निधी दुष्काळ निवारणासाठी वापरण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय रस्ते बांधणीची कामे करताना जलसाठे (साठवण तलाव व पाण्याचे स्रोत) तयार करावेत आणि महसूल विभागाच्या पडीक जागा महिला बचत गटांना चारा उत्पादनासाठी द्याव्यात, असा निर्णयही घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Flight Crew Ban: पाकिस्तानसह मुस्लिम देशांच्या क्रू मेंबर्सवर बॅन! 'फ्लाईदुबई' घटनेनंतर इस्रायल-फ्रान्सने घेतला मोठा निर्णय

केराटिन ट्रीटमेंटसाठी वारंवार पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही! घरच्या घरी असा बनवा सोपा हेअर मास्क

W,W,W,W,W ! दक्षिण आफ्रिकन गोलंदाजाचा कहर, ट्वेंटी-२०त एकाच षटकात सलग पाच विकेट्स VIDEO

Pune News : कामकाजात दुर्लक्ष भोवले; आरोग्‍य विभागाच्‍या दोन सहाय्यक संचालकांचे निलंबन

Maharashtra Live News : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पुण्यात महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT