पुणे

अग्रलेख...सल्फरऐवजी सीओटू चा वापर

CD

क्रांतिकारी प्रयोग
.................
साखर निर्मितीसाठी सल्फरऐवजी आसवनी प्रकल्पांतून मिळणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईडचा वापर हा मानवी आरोग्य, पर्यावरण आणि उद्योगाची अर्थव्यवस्था या तिन्ही पातळ्यांवर क्रांतिकारी ठरू शकतो.
...............
यावर्षीचा गळीत हंगाम अनेक अंगांनी आव्हानात्मक आहे. महाराष्ट्र दुष्काळाने होरपळतोय. त्यामुळे पाण्याअभावी ऊस शेतात वाळण्यापेक्षा लवकरच कारखान्यांना घालण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे साखर उतारा कमी येऊन त्याचा फटका कारखान्यांना बसणार आहे. दुसरीकडे साखर उत्पादन खर्च सातत्याने वाढत असताना मागील सात वर्षांपासून साखरेचे किमान विक्री मूल्य केंद्र सरकारने वाढविलेले नाही. त्यामुळे कारखाने आर्थिक अडचणीत आहेत. खरे तर मागील काही वर्षांपासून साखर उद्योगाबाबत काहीच चांगले घडत नसताना एक चांगली बातमी पुढे आली आहे. यंदाच्या गळीत हंगामापासून ‘नॅचरल शुगर’कडून साखर उत्पादनासाठी गंधक (सल्फर) ऐवजी कार्बन डाय ऑक्साईडचा वापर केला जाणार आहे. विशेष म्हणजे हा देशातील पहिलाच प्रयोग असून या तंत्राचा विस्तार इतर कारखान्यांमध्ये झाल्यास ही उद्योगासाठी मोठी दिलासादायक बाब ठरणार, यात शंकाच नाही. इस्त्राईल-अमेरिक यांचे इराणबरोबर सुरु असलेल्या युद्धामुळे होर्मुझची सामुद्रधुनी अलीकडे बराच काळ बंद होती. त्यावेळी साखर उद्योगासाठी आयात करावे लागणारे साहित्य तसेच सल्फर सारखी रसायने यांचा तुटवडा होऊन ती प्रचंड महागली. त्यामुळे साखरेचा उत्पादन खर्च देखील वाढला. शिवाय सल्फर आरोग्यासाठी देखील हानिकारक आहे. अशा वेळी साखर निर्मितीसाठी सल्फरऐवजी आसवनी प्रकल्पांतून मिळणाऱ्या कार्बन डाय ऑक्साईडचा वापर हा अनेक अंगानी फायदेशीर ठरू शकतो.

ज्या साखर कारखान्यांकडे आधीपासूनच आसवनी प्रकल्प (डिस्टिलरी) आहेत, त्यांना या प्रयोगाचा त्वरित आणि जास्त लाभ मिळू शकतो. त्याचे कारण म्हणजे अल्कोहोल, इथेनॉल निर्मिती दरम्यान किण्वन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात शुद्ध कार्बन डाय ऑक्साईड वायू बाहेर पडतो. हा कार्बन डायऑक्साईड वायू सोडून देण्याऐवजी तो थेट साखर शुद्धीकरणासाठी कारखाने वापरू शकतात. अर्थात सव्वा लाख रुपये प्रति टन गंधकाऐवजी कारखान्यांना साखर शुद्धीकरणासाठी मोफतच कच्चामाल जागेवरच उपलब्ध होणार आहे. आसवनी प्रकल्प आधीपासूनच कार्यरत असल्याने कार्बन डाय ऑक्साईड गोळा करण्यासाठी आणि साखर कारखान्यांपर्यंत वाहून नेण्यासाठी फक्त पाईप लाइन आणि कॉम्प्रेसर यंत्रणा बसवावी लागेल, त्यासाठी फारसा खर्च देखील येणार नाही. प्रतिटन सव्वा लाख रुपये खर्च करून आयात करावा लागणारा किंवा मिळणारा सल्फर आणि त्याचा तुटवडा यामुळे होणारी कसरत थांबणार आहे. एवढेच नव्हे तर कारखान्यांचा साखर उत्पादन खर्च बऱ्यापैकी कमी होणार आहे. औद्योगिक कार्बन डाय ऑक्साईड वायूचा येथे पुनर्वापर होत असल्याने तो हवेत सोडून होणारे प्रदूषण टळेल. अर्थात पर्यावरणाच्या दृष्टिने देखील हे सकारात्मक पाऊल ठरणार आहे. शिवाय सल्फरशिवाय साखर उत्पादन होणार असल्याने ग्राहकांना पूर्णपणे शुद्ध, सुरक्षित आरोग्यदायी साखर उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा राज्यातील इतर कारखान्यांनी देखील स्वीकार करावा. हे कारखान्याचे अर्थकारण, पर्यावरण आणि ग्राहकांचे आरोग्य अशा सर्वांच्याच हिताचे ठरणार आहे. या तंत्रज्ञानाविषयी काही शंका असतील, किंवा कारखानानिहाय काही अडचणी कुणाला येणार असतील त्याची माहिती नॅचरल शुगर कडून घेता येईल. परंतु आगामी काळात हे तंत्रज्ञान राज्यभरच नाही तर देशभर पोहोचायला हवे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ ODI Squad: ट्वेंटी-२० संघ जाहीर केला, मग वन डेचा का नाही? निवड समिती पर्यायी संघ निवडण्याच्या तयारीत; पण असं का?

Navratri 2026: घटस्थापनेसाठी सर्वोत्तम मुहूर्त 'या' वेळेत; जाणून घ्या नवरात्रीतील पूजा, नियम अन् शुभ रंग!

Latest Marathi News Live Update : दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचे आंदोलन तीव्र; राहुल गांधींसह नेते रस्त्यावर

Soybean Crop Issue : सोयाबीनचे दाणे ज्वारी सारखे; शिवना परिसरातील विदारक स्थिती

सध्या काय करते 'फॉरेनची पाटलीण' मधली जेनिफर? योगगुरूशी केलं लग्न, नावही बदललं, फोटो पाहून ओळखणं झालंय कठीण

SCROLL FOR NEXT