पुणे

सांगली : क्रांती कारखान्याकडून प्रतिटन १०० रुपयांचा अंतिम हप्ता

CD

‘क्रांती’कडून प्रति टन १०० रुपयांचा अंतिम हप्ता

शरद लाड यांची माहिती; दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार

ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली ः पलूस तालुक्यातील कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ मधील उसासाठी प्रति टन १०० रुपयांचा अंतिम हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अध्यक्ष शरद लाड यांनी दिली.
लाड म्हणाले, की क्रांती कारखान्याने २०२५-२६ च्या गळीत हंगामात ९ लाख ५२ हजार टन उसाचे गाळप केले. या हंगामासाठी कारखान्याची प्रति टन ३ हजार ३६८ रुपये एफआरपी निश्चित झाली होती. मात्र शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत एफआरपीपेक्षा प्रति टन १३२ रुपये अधिक देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. त्यानुसार, १२ कोटी ५७ लाख रुपये अतिरिक्त देण्यात येणार असून, अंतिम ऊसदर प्रति टन ३ हजार ५०० रुपये जाहीर केला होता. त्यापैकी आतापर्यंत प्रति टन ३ हजार ४०० रुपये अदा केले आहेत. उर्वरित प्रति टन १०० रुपयांचा अंतिम हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
आगामी गळीत हंगामासाठी शेतकऱ्यांनी आपला ऊस क्रांती कारखान्याला पुरवठा करावा, असे आवाहन त्यांनी केले. कारखाना आणि शेतकऱ्यांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ करून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. या वेळी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आमदार अरुण लाड, उपाध्यक्ष जयप्रकाश साळुंखे, संचालक मंडळाचे सदस्य, कार्यकारी संचालक, सेक्रेटरी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सब गोलमाल! पत्नी IPS, पती IAS, कुटुंबाच्या नावे ४० व्हिलांची खरेदी, भाडं वर्षाला २ कोटी; सरकारने केली कारवाई

महाडमध्ये दर मंगळवारी १२ तास पाणीपुरवठा बंद, एमआयडीसी प्रशासनाचा मोठा निर्णय; कोणत्या भागांना फटका?

Money Tips: शॉपिंग अन् खर्चाची घाई नको! पहिल्या पगारातून नेमकं काय करायचं?

Latest Marathi News Update : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला आदेश

Madha Politics: माढ्याची खासदारकी राष्ट्रवादीला सोपी! पदवीधरच्या निकालाचा परिणाम; दोन आमदार पक्षासोबत तर दोन भाजपच्या जवळ

SCROLL FOR NEXT