Revolver 
पुणे

पोलिसांवर मंत्रालयातूनच ‘निशाणा’

संदीप घिसे

पिंपरी - स्वसंरक्षणाचे कारण पुढे करत अनेकांनी पोलिस आयुक्‍तांकडे पिस्तूल परवाना मागितला. मात्र, पोलिसांनी त्यांची मागणी धुडकावून लावली. त्यातील २६ जणांना थेट मंत्रालयातून पिस्तूल परवाना दिला असून, त्यात शहरातील गुंठामंत्र्यांची संख्या सर्वाधिक आहे. २६ जणांपैकी १५ जण हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणारे आहेत. 

शांत आणि सुरक्षित म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख होती. शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ झाली, तशी गुन्हेगारीही वाढली. जमिनीला सोन्याचे भाव आल्याने गुंठामंत्र्यांच्या खिशात पैसा खुळखुळू लागला आहे.

स्टेट्‌स सिम्बॉल म्हणून अनेक जणांनी पिस्तूल बाळगण्यास सुरवात केली आहे. मात्र, चुकीच्या व्यक्‍तीच्या हातात पिस्तूल गेल्यास काय परिणाम होतो, हे काही दिवसांपूर्वी वडगाव मावळ येथे पाहायला मिळाले. १२ दिवसांपूर्वी मंत्रालयातून पिस्तूल परवाना मिळविलेल्या पुनावळे येथील दादा बाळू ढवळे याने थेट उपनिरीक्षकावरच गोळीबार केला. 

प्रदर्शन न करण्याचा नियम
संरक्षण, खेळाडू आणि शेतकरी यांना शस्त्र परवाना दिला जातो. अनेक जण संरक्षणाचे कारण सांगत पिस्तुलाचा परवाना मिळवितात. तसेच धनदांडगे नागरिकही प्रतिष्ठेच्या कारणासाठी परवाना मागतात. परवाना दिल्यानंतरही पिस्तुलाचे प्रदर्शन करू नये, असा नियम असतानाही अनेक जण ते दर्शनी भागावर लावतात. 

लोकप्रतिनिधींमध्ये क्रेझ 
पिस्तूल परवाना मिळावा, यासाठी काही लोकप्रतिनिधींनी पोलिस आयुक्‍तांकडे अर्ज केला होता. त्यापैकी काहींना शस्त्रपरवाना नाकारण्यात आला. नाकारलेल्या लोकप्रतिनिधींनीही थेट मंत्रालयातून पिस्तुलाचा परवाना मिळविला. 

१५ लाखांत मंत्रालयातून शस्त्रपरवाना मिळत असल्याची चर्चा पोलिस दलात सुरू आहे.

पिस्तूल परवाना मागणाऱ्या व्यक्‍तीला खरीच त्याची आवश्‍यकता आहे का, याची माहिती पोलिस घेतात. त्यानंतर परवाना द्यायचा की नाही, याबाबत निर्णय घेतला जातो. वडगाव मावळ येथील गुन्ह्यातील आरोपीला मंत्रालयातून परवाना देण्यात आला. यामुळे मंत्रालयातून मंजूर होऊन आलेल्या परवान्याबाबत फेरविचार व्हावा, याबाबत सरकारला विनंती करणार आहोत. 
- आर. के. पद्मनाभन, पोलिस आयुक्‍त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Parbhani : परभणीत एकनाथ शिंदेंच्या भाषणाला सुरुवात होताच ‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणा अन्... नेमकं काय घडलं?

अमेरिकेत शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर नवे निर्बंध! CPT इंटर्नशिप का आली अडचणीत? भारतीय विद्यार्थ्यांवरही परिणाम होणार?

Pimpalvandi Minor Murder Case: पिंपळवंडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार-हत्येप्रकरणी २ सप्टेंबरपर्यंत चार्जशीट; फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याचा मंत्र्यांचा निर्धार

Relationship Numerology: 'या' मूलांकांच्या नणंद-भावजयीची जोडी असते सुपरहीट; पाहा अंकशास्त्रातील ३ सर्वात बेस्ट कॉम्बिनेशन्स!

Sunil Sharma Death : राजकारणात खळबळ! भाजपच्या दिग्गज नेत्याने जीवन संपवलं; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT