पुणे

धान मर्यादा वाढ

CD

रब्बी हंगामातील धान खरेदी मर्यादेत वाढ
--
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; एकरी १३ ऐवजी २० क्विंटल खरेदी

ॲग्रोवन वृत्तसेवा
गोंदिया ः रब्बी पणन हंगामात शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी हेक्टरी ४९.४० क्विंटलची मर्यादा निश्चित करण्यात आली असून, आता पूर्वीच्या एकरी १३ क्विंटलऐवजी २० क्विंटलप्रमाणे शेतकऱ्यांकडून हमीभावाने धान खरेदी केली जाणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
धान खरेदीची एकरी मर्यादा वाढवावी, यासाठी शेतकरी तसेच लोकप्रतिनिधींनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर या मागणीला यश मिळाले असून शासनाने खरेदी मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणावर धानाचे उत्पादन घेतले जाते. खरीप हंगामात सुमारे एक लाख ९५ हजार हेक्टर, तर रब्बी हंगामात ७६ हजार हेक्टर क्षेत्रावर धान लागवड करण्यात आली होती. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळामार्फत शासकीय धान खरेदी केंद्रांवरून धान खरेदी केली जाते. पूर्वी उत्पादनाच्या तुलनेत शासकीय खरेदी केंद्रांवर धान विक्रीची मर्यादा केवळ एकरी १३ क्विंटल होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना उर्वरित धान बाजारात कमी दराने विकावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने खरेदी मर्यादेत वाढ केली आहे. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या अधिक उत्पादनाची विक्री शासकीय केंद्रांवर करता येणार असून, दलालांवरील अवलंबित्व कमी होईल. परिणामी, शेतकऱ्यांना हमीभावाचा थेट लाभ मिळणार आहे.
.......

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT