Rickshaw 
पुणे

‘रिक्षा ॲप’ला वाढता kतिसाद

सकाळवृत्तसेवा

पुणे - रिक्षाचालकाच्या मुलाने तयार केलेल्या ‘रिक्षा ॲप’ला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. रिक्षा चालकांसाठी त्याने हे ॲप तयार केले आहे. कोथरूड, सिंहगड रस्ता व कात्रज परिसरात हे ॲप सध्या मूळ धरू लागले असून, लवकरच संपूर्ण शहरासाठी ते कार्यान्वित होणार आहे.   

राहुल शितोळे या युवकाने प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि वाहतूक पोलिस, रिक्षा संघटनांच्या मदतीने हे ॲप तयार केले आहे. राहुल म्हणाला, ‘‘माझे बाबा दहा वर्षांपूर्वी रिक्षा चालवायचे तेव्हा सुमारे आठशे ते नऊशे रुपयांचा गल्ला जमायचा. तेच प्रमाण आता चारशे ते पाचशे रुपयांवर आले आहे. अशी परिस्थिती केवळ माझ्या बाबांची नसून तमाम रिक्षाचालकांची आहे. त्यातच आता ओला-उबरचे संकट आले आहे. त्यामुळे रिक्षाचालकांसाठी ॲप तयार केले आहे.’’ या ॲपसाठी सुमारे ५०० रिक्षाचालकांची नोंदणी झाली. पहिल्या टप्प्यात कर्वेनगर, कोथरूड, कात्रज आदी परिसरातील नागरिकांना ही सुविधा मिळत आहे. ९८५९१९८५९१ या मोबाईल नंबरवर कॉल रजिस्ट्रेशन केला की, प्रवासी व्यक्तीला रिक्षाची स्थिती, ठिकाण व पोचण्यासाठी लागणारे भाडे आणि रिक्षा चालकाची माहिती एका क्षणात कळते. तसेच लोकेशन ट्रॅकरची सुविधाही यात आहे.

या महागाईच्या काळात रिक्षा चालविणे आणि खर्च एक जोखीम झालेली असताना. प्रवासी व भाड्याची हमी देणारी प्रणाली ‘रिक्षा ॲप’द्वारे निर्माण झाली आहे. यातून आमच्या इंशोरन्स व बेनिफिट पॉलिशिज निघत आहेत. भविष्याची जोखीम हे ॲप घेत आहे. 
- सचिन जाधव, रिक्षाचालक

‘रिक्षा ॲप’ विश्वसनीय आहे. मी कात्रज ते कोरेगाव पार्क असा रात्रीला प्रवास केला आहे. त्या वेळी माझ्या प्रत्येक लोकेशनची माहिती घरी मिळत होती. घरचे निश्‍चिंत होते.
- सुजाता गोरड, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचा थाटात पार पडला विवाहसोहळा! नवरा आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेता

Mahatma Phule Jan Arogya Yojana: गरजू रुग्णांना मोठा दिलासा; महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून २३९९ प्रकारच्‍या आजारांवर उपचार

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील उत्तम नगर येथील आरोपीचे घर बुलडोझरने पाडण्यात येणार

Gujarat Crime: प्रसिद्ध मंदिराच्या बाथरूममध्ये दोन विद्यार्थिनी आढलल्या मृतावस्थेत ; ChatGPT ला विचारली जीवन संपवण्याची पद्धत

India Fuel Prices Stable : मोठी दिलासादायक बातमी ! पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार नाहीत, होर्मुझ सामुद्रधुनीतून पहिली तेल खेप रवाना

SCROLL FOR NEXT