Hanging
Hanging 
पुणे

पुण्यात एका लॉजमध्ये रिक्षाचालकाची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

सकाळवृत्तसेवा

पुणे - वडगाव बुद्रुक येथील एका लॉजमध्ये रिक्षाचालकाने मंगळवारी (ता.14) गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. मात्र, त्यांनी नैराश्य तसेच कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नंदू अंधारे (वय 39, सध्या रा. धनकवडी, मूळ रा. शेवगाव, जि. अहमदनगर) असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधारे यांचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. पुण्यात ते रिक्षा चालवत होते. धनकवडीत भाडेतत्त्वावर घर घेऊन ते एकटेच राहत होते. घटस्फोट झाल्यानंतर त्यांची मुलेही पत्नीकडे राहत होती.

घटनेच्या दिवशी अंधारे यांनी मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गालगत असलेल्या एका लॉजमध्ये खोली भाड्याने घेतली होती. तेथे पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस हवालदार गिरीश धुमाळ पुढील तपास करत आहेत.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : हैदराबादला तिसरा धक्का! अर्धशतक करणाऱ्या अभिषेक शर्माला शशांक सिंगने धाडलं माघारी

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT