rickshaw driver robbed College students pune news  sakal media
पुणे

पुणे : रिक्षाचालकाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची लुट

मंगळवार पेठेतील रेल्वे पुलाजवळ प्रकार, फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वाढदिवसानिमित्त वडीलांनी गावाहून पाठविलेल्या भेटवस्तु आणण्यासाठी रात्रीच्यावेळी रिक्षाने जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रिक्षाचालकाने त्याच्या साथीदारांच्या मदतीने लुटले. विद्यार्थ्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल, रोख रक्कम व ऑनलाईन माध्यमाद्वारे पैसे घेऊन दोघेही रिक्षाचालक पसार झाला. हि घटना रविवारी पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठ परिसरात घडली.

याप्रकरणी अनुप शिवहरी शिगोंकर (वय 18, रा. मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर) या विद्यार्थ्याने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुप हा बुलढाण्यातील शेगाव येथील रहिवासी आहे. सध्या तो बारावीमध्ये असून पुण्यात शिक्षण घेत आहे. अनुपचा वाढदिवस असल्याने त्याच्या वडीलांनी वाढदिवसासाठी त्यास शेगाव येथून खासगी ट्रॅव्हल्समधुन भेटवस्तु पाठविल्या होत्या.

भेटवस्तु घेण्यासाठी तो रविवारी साडे पाच वाजण्याच्या सुमारास संगमवाडी येथील खासगी ट्रॅव्हल्स बसच्या स्थानकाकडे निघाला. त्याचा मित्र सार्थक मालखेडे व तो रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षातून निघाले होते. त्यावेळी रिक्षाचालकाचे साथीदारही रिक्षात होते. त्यांची रिक्षा मंगळवार पेठेत आली, त्यावेळी त्याने रेल्वे पुलाखाली अंधारामध्ये रिक्षा थांबविली. त्यानंतर रिक्षाचालक व त्याच्या साथीदारांनी अनुप व सार्थक या दोघांनाही चाकूचा धाक दाखवुन धमकी दिली. त्यानंतर त्यांनी अनुपकडील दोन मोबाइल संच, त्याचा मित्र साथर्कच्या खिशातील एक हजार रुपयांची रोकड लुटली. रिक्षाचालकाने त्यांना धमकावून ऑनलाइन ऍपपद्वारे दोन हजारांची रोकड पाठविण्यास सांगितले. रिक्षाचालकाने त्यांच्याकडील 26 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने काढून नेला. या घटनेनंतर रिक्षाचालक व त्याचे साथीदार पसार झाले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमित शेटे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Metro: पुणेकरांची प्रतीक्षा लवकरच संपणार; हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे १२ स्थानके तयार, आता फक्त सरकारच्या निर्णयाची वाट!

Kolhapur Illegal Gravel Mining : कोल्हापूरचा बिहार होतोय का? प्रांताधिकाऱ्यांना खडी चोरीची टीप दिली अन् थेट डंपर अंगावर घातला

Latest Marathi News Live Update : २४ ते २५ जूनच्या सुमारास कोकणात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याचा अंदाज

Chhatrapati Sambhajnagar: शीतपेयातून पत्नीसह दोन मुलांवर विषप्रयोग; उपचारादरम्यान चारवर्षीय मुलाचा मृत्यू

Viral Video : आरटीओ कारवाईपासून वाचण्यासाठी चालकाने धावत्या डंपरमधून एक्सप्रेसवे वर सांडले दगड; वाहतूक ठप्प, पोलीस फावडे घेऊन लागले कामाला

SCROLL FOR NEXT