anil-parab 
पुणे

रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ स्थापन करणार;अनिल परब यांची ग्वाही

सकाळवृत्तसेवा

पुणे - रिक्षाचालक कल्याणकारी मंडळ स्थापन करून रिक्षा चालकांची अवाजवी विमा हप्त्यातून सुटका करणे हे आपले स्वप्न आहे. ते महाआघाडी सरकारचा परिवहन मंत्री म्हणून आपण सत्यात आणणार आहोत. अशी निःसंदिग्ध ग्वाही राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी रिक्षा पंचायत व राज्य रिक्षा संघटना कृती समितीच्या शिष्टमंडळाला आज दिली. 

समितीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव, सरचिटणीस नितीन पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाशी ते आज बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गोऱ्हे, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे उपस्थित होते. 

परब म्हणाले, "लॉकडाउनच्या काळात रिक्षा चालकांना आम्ही फार दिलासा देऊ शकलो नाही याची आम्हाला जाणीव आहे. इतर वाहनधारकांना काही प्रमाणात तरी करमाफी देता आली. रिक्षा धारकांकडून सुरवातीलाच एक रकमी कर घेत असल्याने त्यांना तोही दिलासा देता आला नाही. परंतु अशा तत्कालिक मदतीपेक्षा रिक्षा चालकांचे आयुष्यभराचे कल्याण करणारे, रिक्षा चालक कल्याणकारी मंडळ स्थापन करणे हे माझं स्वप्न आहे. या मंडळाकडे रिक्षाच्या विमा जोखमीची जबाबदारी देऊन सध्या भराव्या लागणाऱ्या भरमसाट विमा हप्त्यातून रिक्षा चालकाला आम्हाला सोडवायचे आहे. यासाठी केंद्र सरकारचेही सहकार्य लागणार आहे, ते आम्ही मागू. भरमसाट विमा हप्ता मुक्ती बरोबरच पंचायतीच्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे वैद्यकीय साहाय्य, निवृत्ती नंतर लाभ, मुलांना शिक्षणासाठी मदत, अतिरिक्त उत्पन्न उपाय या मंडळामार्फत रिक्षा चालकाला मिळतील. तसेच रिक्षांची संख्येत भरमसाट वाढ झाली आहे. हे म्हणणेही रास्त असून रिक्षाचा मुक्त परवानाही बंद करण्याच्या भूमिकेत आम्ही आहोत. पुण्याच्या रिक्षा व छोट्या वाहनांचा तपासणीसाठी दिवे घाट वाचवण्यासाठी आळंदी रस्ता परिवहन कार्यालयात रोलर ब्रेक टेस्टर व 100 मीटर तपासणी धावपट्टीच्या कामालाही वेग देण्यात येईल. लॉकडाउन काळातील विमा परतावा मिळवून देण्यासाठी परिवहन विभागाचे वाहन बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी परिवहन आयुक्तांशी बोलून सूचना दिल्या जातील. हलाखीच्या स्थितीत आलेल्या रिक्षा चालकांची मागणी असेल,तेथे रिक्षा भाडे दरवाढीचा विचार करण्याच्या सूचनाही आम्ही परिवहन प्राधिकरणाला दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT