Ring Road 
पुणे

रिंगरोडलगत चारशे एकर जागा द्या

सकाळवृत्तसेवा

पुणे - प्रस्तावित रिंगरोडलगत ४०० एकर जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाने पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) केली आहे. पीएमआरडीए क्षेत्राचा विकास आराखडा तयार केला जात आहे. या आराखड्यात बाजार आवाराकरिता जागा आरक्षित ठेवण्यात यावी, असे पत्र देण्यात आले आहे.

सुमारे चाळीस वर्षांपूर्वी शहराच्या मध्य भागातील मंडईतील भाजीपाला आणि नाना-भवानी पेठेतील किराणा भुसार मालाचा घाऊक बाजार स्थलांतरित करण्यास सुरवात झाली होती. तेव्हा अस्तित्वात असलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार आवार १७० एकर क्षेत्रांत सुरू करण्यात आला. शहराच्या कडेला असलेला हा बाजार आता शहराच्या विस्तारामुळे मध्यभागात आला आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची वाढणारी क्षमता आणि जास्त वहन क्षमता असलेल्या अवजड वाहनातून माल वाहतूक सुरू झाली आहे. बाजारातील उलाढाल वाढत असल्याने या भागात वाहतुकीची कोंडी वारंवार निर्माण होते. स्थानिक भाग आणि परराज्यांतून शेतमालाची आवक वाढत आहे. 

बाजार आवारातील विशेषत: तरकारी विभागातील गाळ्यांचे बांधकाम जुने झाले आहे. स्ट्रक्‍चरल ऑडिटनुसार हे बांधकाम धोकादायक झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. यापार्श्‍वभूमीवर समितीच्या प्रशासनाने बाजार आवाराचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव तयार केला असून, अद्याप तो मार्गी लागलेला नाही. पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतागृह, सांडपाणी वाहिन्या, खराब रस्ते आदी प्रश्‍न अद्यापि सुटू शकले नाहीत. शहरात वाढणारी वाहनांची संख्या आणि वाहतूक कोंडीमुळे बाजार आवारात येणाऱ्या वाहनांच्या वाहतूक मार्गावर पोलिसांनी निर्बंध घातले आहेत. अशा विविध अडचणींमुळे पुणे शहरालगत पर्यायी जागा शोधण्याचा प्रयत्न यापूर्वी प्रशासनाने केला होता. पिंपरी सांडस येथे जागा मिळविण्याचा प्रयत्न झाला होता. सध्या पीएमआरडीए त्यांच्या क्षेत्राचा विकास आराखडा करीत आहे. या आराखड्यात बाजार आवाराकरिता जागा आरक्षित ठेवली, तर त्या ठिकाणी पर्यायी बाजार उपलब्ध करता येईल, त्याचा फायदा व्यापार वाढीस होऊ शकतो.

शहराच्या बाहेरून जाणाऱ्या वर्तुळाकार मार्गावर जागा उपलब्ध झाली, तर या ठिकाणी असलेला बाजार तेथे नेता येईल. शहराची जेवढी गरज आहे, तेवढाच माल येथील बाजारात आणता येईल. उर्वरित म्हणजे इतर जिल्हे आणि राज्यांत पाठविण्यात येणाऱ्या मालाचे व्यवहार तेथील बाजारात करता येतील.
- बी. जे. देशमुख,  प्रशासक, बाजार समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT