Ringroad Sakal
पुणे

पुणे रिंगरोडसाठीच्या मोजणीचे २२ गावांमधील काम पूर्ण

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हाती घेतलेल्या रिंगरोडच्या भूसंपादनासाठी मार्गिकेच्या मोजणीचे काम गतीने सुरू झाले आहे.

प्रशांत पाटील

पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) (MSRDC) हाती घेतलेल्या रिंगरोडच्या (Ringroad) भूसंपादनासाठी (Land Acquisition) मार्गिकेच्या मोजणीचे काम (Counting Work) गतीने सुरू झाले आहे. दोन महिन्यांत पश्‍चिम भागातील २२ गावांतील म्हणजे सुमारे ३७० हेक्टर रिंगरोडच्या मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. (Ringroad Land Aquisition Counting Work Complete in 22 Villages)

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या रिंगरोडचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. या रिंगरोडचे पूर्व व पश्‍चिम असे दोन टप्पे आहेत. पूर्व रिंगरोड उर्से (ता. मावळ)- केळवडे (ता. भोर) असा आहे. पूर्व रिंगरोड हा मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्‍यातून जाणार आहे तर पश्‍चिम रिंगरोडला केळवडेपासून सुरुवात होणार असून हवेली, मुळशी आणि मावळ येथील उर्से टोलनाका येथे एकत्र येणार आहे. पश्‍चिम भागातील मार्गिकेच्या मोजणीचे कामाला २१ एप्रिल रोजी सुरुवात झाली. दोन महिन्यांत २२ गावांतील मोजणीचे काम पूर्ण झाले. पश्‍चिम भागातील चार तालुक्यांतील सुमारे ६९५.१०९९ हेक्टर जागेचे भूसंपादन करणार आहे.

मोजणी पूर्ण झालेली गावे

पिंपळोली, केमसेवाडी, जवळ, पडळघर वाडी, रिहे, घोटावडे, मातेरेवाडी, अंबटवेट, भरे, केसरआंबोली, उरवडे, आंबेगाव, काटेवाडी, सांगरून, मांडवी बुद्रुक, मालखेड, वरदाडे, खांबगाव मावळ, घेरा सिंहगड, मोरडवाडी, रांजणे आणि कुसगाव.

पश्‍चिम भागातील रिंगरोडच्या मोजणीचे काम गतीने सुरू असून, आतापर्यंत २२ गावांतील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. चार तालुक्यांतील ३७ गावांतून हा रिंगरोड जाणार आहे.

- संदीप पाटील, उपविभागीय अधिकारी, एमएसआरडीसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ''जर इराणने माझी हत्या केली तर...'' डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः सांगितला पुढचा प्लॅन

Numerology : 'या' मुलांकाचे पुरुष लग्नानंतर बदलून टाकतात बायकोचं आयुष्य; फक्त चूल-मुल न बघता 'तिला' पोहोचवतात यशाच्या शिखरावर

शाळा शिक्षणासाठी, राजकारणासाठी नाहीत! शाळेत मुख्यमंत्री विजय यांचा कार्यक्रम दाखवण्याऱ्या मुख्यध्यापकावर कारवाई, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पालखीच्या पुणे मुक्कामादरम्यान 72 संशयित चोर पोलिसांच्या ताब्यात

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना मोठा दिलासा; ठाण्यात तिकटीसाठी ११ ते ३१ जुलैदरम्यान अतिरिक्त आरक्षण खिडक्या, तीन गाड्यांचा थांबा..

SCROLL FOR NEXT