बिबवेवाडी - ‘कोडनेम बाजार’ प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी चौकशी व बुकिंगसाठी आलेले व्यापारी. 
पुणे

‘कोडनेम बाजार’मध्ये होणार व्यापाराचा उत्कर्ष

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरातील मोक्‍याचे ठिकाण, मालाच्या साठवणुकीसाठी अद्ययावत गोदाम, माल उतरविणे व भरण्याची सुविधा, वाहनांसाठी प्रशस्त पार्किंग यासह अनेक सुविधा असलेले व्यापाराचे नवीन ठिकाण बिबवेवाडीत निर्माण होत आहे. ‘जयराज ग्रुप’ आणि ‘सॉलिटेअर’ उभारत असलेल्या ‘कोडनेम बाजार’ या प्रकल्पातून होलसेल मार्केटची नवीन संकल्पना अस्तित्वात येणार आहे. 

गंगाधाम चौकातून हाकेच्या अंतरावर असलेल्या या २२ एकरच्या भव्य प्रकल्पात ५७४ ते १ हजार ५०० चौरस फुटापर्यंतची तब्बल दोन हजार दुकाने असणार आहेत. दोन फेजमध्ये तयार होत असलेल्या प्रकल्पाच्या पहिल्या फेजचे भूमिपूजन शनिवारी झाले. विशेष म्हणजे आतापर्यंत ८५० पेक्षा अधिक दुकानांचे बुकिंगही झाले आहे. हॉटेलिंग, हार्डवेअर, औद्योगिक वस्तू, फर्निचर, कपडे आणि ॲक्‍सेसरीज, ज्वेलरी, औषधे, स्टेशनरी, बेबी प्रॉडक्‍ट आणि इलेक्‍ट्रॉनिक अशा विविध प्रकारची दुकाने या ठिकाणी असणार आहेत. 

या प्रकल्पाची उभारणी करण्यापूर्वी ‘जयराज ग्रुप आणि सॉलिटेअर’ यांनी बाजारपेठेचे सर्वेक्षण करून मार्केट यार्ड, तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, फुरसुंगी यांसह पुणे व पिंपरी-चिंचवड येथील बाजारपेठांचा आढावा घेतला. या सर्व ठिकाणी पार्किंग, स्वच्छतागृह, माल वाहनातून उतरवणे व भरणे अशा समस्या असल्याचे दिसले. या सर्व अडचणी सोडविण्यात वेळ न जाता व्यापाऱ्यांना केवळ व्यवसायात लक्ष देता यावे, या दृष्टीने प्रकल्पाची निर्मिती करण्यात येत आहे. व्यापारवाढीसाठी हा प्रकल्प एक महत्त्वाचा मार्ग ठरेल, अशी खात्री वितरण विभागाचे उत्कर्ष मांगलिक यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वाघ किंवा बिबट्या गावात येताच मोबाईलवर येणार अलर्ट; नागपुरात नवी यंत्रणा सुरू, AI हिंस्त्र प्राण्यांचा धोका कसा ओळखणार?

IPL 2026 Marathi News: गतविजेत्या RCB ला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी झटका! प्रमुख खेळाडूच्या खेळण्यावर अनिश्चिततेचे सावट

Nagpur News: मेयोतील कॅन्टीन बंद, मेडिकलमध्ये शिजली खिचडी; रविभवन कॅन्टीनमध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा आधार

Gas Shortage: हॉटेल व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय! कमर्शियल सिलिंडरचा कोटा २० टक्के, पण 'यांनाच' मिळेल गॅस

EPFO PF Account: नोकरी बदलली? जुन्या PF खात्यातील पैशांची चिंता करू नका; ‘फॉर्म 13’ करेल सगळी मदत

SCROLL FOR NEXT