मंचर, ता. ३१ : ‘‘पार्टी, मिरवणूक व वरात या समारंभांमध्ये सर्रास मद्यसेवन व अन्य व्यसनाचे प्रमाण वाढत आहे. अल्पवयीन मुलेही त्यात भरडली जात आहेत. पारंपरिक व आनंदाचे प्रसंग आज बदनाम झाले आहेत, अशा समारंभांतूनच व्यसनाचे प्रमाण वाढणे ही चिंताजनक बाब आहे. व्यसनमुक्तीची चळवळ आंबेगाव तालुक्यातील प्रत्येक गावात, शाळा व महाविद्यालयात राबविण्यासाठी पुढाकार घेतला जाईल,’’ असे विवेकवसा फाउंडेशनचे संघटक व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विशाल विमल यांनी सांगितले.
पिंपळगाव-खडकी (ता. आंबेगाव) येथील श्रीराम विद्यालयात ‘चला, व्यसन मुक्तीच्या चळवळीत सहभागी होऊ’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात विशाल विमल बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक दादासाहेब फापाळे, शालेय गुणवत्ता संवर्धन अभियानाचे परीक्षक दत्तात्रय भोर, ग्रामस्थ योगेश बारवकर, लिंबाजी पोखरकर, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
विमल म्हणाले, “व्यसनजन्य पदार्थांचे पहिले सेवन झाल्यापासूनच मेंदू या पदार्थांचा गुलाम बनतो. त्यातून बाहेर पडणे अत्यंत कठीण होते. या पदार्थांचा मेंदूवर विपरीत परिणाम होऊन मानसिक संतुलन बिघडते. व्यसनजन्य पदार्थांतील रासायनिक घटक मेंदूतील नैसर्गिक प्रक्रियांवर आघात करतात, त्यामुळे होणारी मेंदूची हानी कोणत्याही औषधाने भरून येत नाही.”
सूत्रसंचालन केशव टेमकर यांनी केले, आभार बबन बांगर यांनी मानले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.