पुणे

सांगली : खाऊच्या पानांच्या दरात वाढ

CD

खाऊच्या पानांच्या दरात वाढ

श्रावण महिन्यामुळे मागणी; दर टिकून राहण्याची शक्यता

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा
सांगली : महिनाभरापूर्वी खाऊच्या पानांना अपेक्षित मागणी नसल्याने दर दबावात होते. मात्र श्रावण महिन्यात पूजेसाठी मागणी वाढल्याने पानांच्या दरात सुधारणा झाली आहे. सध्या दर्जानुसार खाऊच्या पानांना प्रति तीन हजार पानांमागे ५०० ते १५०० रुपये दर मिळत असून, आगामी काळात दर स्थिर राहण्याची शक्यता पान उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दर वाढले असले, तरी मिळणारा दर आणि उत्पादन खर्च यांचा ताळमेळ बसविणे कठीण झाले आहे. एप्रिल आणि मे महिन्यांतील कडक उन्हाचा तीव्र फटका पानमळ्यांना बसला होता. वाढत्या उष्णतेमुळे वेलींना अपेक्षित फुटवा मिळाला नाही. त्यामुळे उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला. मात्र जून आणि जुलै महिन्यात पोषक वातावरणामुळे पानांचा दर्जा व गुणवत्ता सुधारली.
उत्पादन आणि गुणवत्ता सुधारली असली, तरी गेल्या दीड महिन्यापासून पानांच्या बाजारपेठेत चिंतेचे वातावरण होते. मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, लातूर, धाराशिव, पंढरपूर या प्रमुख पेठांसह गुजरातमध्येही पानांची मागणी घटल्याने बाजारातील उठाव मंदावला होता. परिणामी, गेल्या दीड महिन्यात पानांच्या दरात वाढ झाली नाही.
श्रावण महिन्यात पूजेसाठी पानांची मागणी अधिक असते. त्यामुळे या कालावधीत मागणी वाढली असून दरही सुधारले आहेत. श्रावणानंतर गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी हे सण आहेत. त्यामुळे या कालावधीत खाऊच्या पानांची मागणी आणि दर स्थिर राहतील, असा अंदाज पान उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पानांचे दर (प्रति तीन हजार)
कळी : ५०० ते १०००
हक्कल : ३०० ते ६००
फाफडा : ५०० ते १५००

कोट ---
गेल्या दीड महिन्यांच्या प्रदीर्घ मंदीनंतर आता कुठे पानांच्या दरात वाढ झाली असली, तरी मिळणारा दर आणि उत्पादन खर्च यांचा ताळमेळ बसविणे कठीण आहे. परंतु येणाऱ्या सणांमध्ये दर स्थिर राहतील, असा अंदाज आहे.
-चंद्रकांत खाडे,
पान उत्पादक शेतकरी, बेडग, ता. मिरज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup, IND vs PAK: भारताकडून गोलचा पाऊस अन् पाकिस्तान आऊट! दणदणीत विजयासह हरमनप्रीतचा संघ पुढच्या फेरीत प्रवेश

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

Marathi News Live Updates : 'आप' नेते सत्येंद्र जैन यांना, इतर चौघांसह १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर राऊस ॲव्हेन्यू न्यायालयातून नेले

Yamaha RayZR 125 ला नवा लूक! नवीन रंगांसह मिळणार TFT डिस्प्ले आणि नेव्हिगेशन स्मार्ट फीचर्सचा फूल धमाका

Jintur Rescue News: तीन वर्षांचा चिमुकला १५ फूट खोल बोअरवेलमध्ये अडकला; दोन तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर

SCROLL FOR NEXT