पुणे

तीव्र उष्णतेच्या दिवसांमध्ये मोठी वाढ

CD

नवी दिल्ली, ता. २४ (पीटीआय) : हवामान बदलाचा परिणाम म्हणून भारतात तीव्र उकाड्याच्या दिवसांमध्ये मोठी वाढ झाली आहे. १९७० च्या दशकात वर्षाला सरासरी १०१ दिवस असणारे हे प्रमाण २०१६ ते २०२५ या काळात १४१ दिवसांपर्यंत पोहोचले असल्याचे ‘क्लायमेट सेंट्रल’ या संशोधन संस्थेच्या ताज्या अहवालात म्हटले आहे.
जेव्हा ‘वेट-बल्ब’ तापमान २५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त होते, तेव्हा तो दिवस मानवी शरीरासाठी धोकादायक मानला जातो. हे तापमान उष्णता आणि आर्द्रता यांचे एकत्रित मोजमाप असून ते मानवी शरीराला प्रत्यक्ष किती त्रास होतो, हे दर्शवते. हवेत आर्द्रता असताना वाढलेल्या उष्णतेमुळे शरीरातील नैसर्गिक थंडावा निर्माण करणारी घाम येण्याची प्रक्रिया विस्कळित होते. परिणामी, गंभीर आजार किंवा प्रसंगी मृत्यू ओढवण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जागतिक स्तरावरही ही स्थिती चिंताजनक आहे. १९७० च्या दशकात वर्षाकाठी सरासरी १० दिवस असणाऱ्या अशा धोकादायक दिवसांची संख्या आता २३ पर्यंत वाढली आहे. विशेषतः उष्णकटिबंधीय प्रदेशात ही वाढ अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. १९७० पासून जगभरात तीव्र उकाड्याचे जेवढे दिवस नोंदवले गेले, त्यापैकी ६४ टक्के दिवस हे मानवनिर्मित हवामान बदलामुळे निर्माण झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. हवामान बदल आता केवळ एक घटक नसून, वाढत्या उष्णतेचे ते मुख्य कारण ठरत आहे. यामुळे कोट्यवधी लोकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचे अहवालात म्हटले आहे.
जागतिक हवामान संघटनेच्या अहवालानुसार, औद्योगिक क्रांतिपूर्व काळाच्या तुलनेत पृथ्वीचे सरासरी तापमान सुमारे १.३ अंश सेल्सिअसने वाढले आहे. तापमानवाढ १.५ अंशांच्या मर्यादेच्या जवळ पोहोचत असल्याने उष्णतेच्या लाटा, अतिवृष्टी, दुष्काळ आणि जंगलात वणवे पसरणे यासारख्या तीव्र हवामान घटनांची वारंवारता वाढत आहे.

शहरे उष्णतेची बेटे
भारतातील परिस्थिती विशेषतः चिंताजनक मानली जाते. कारण मोठी लोकसंख्या शेती, बांधकाम आणि इतर मैदानी कामांवर अवलंबून आहे. तीव्र उकाड्यामुळे कामगारांची उत्पादकता घटते; उष्माघात, निर्जलीकरण, हृदयविकार आणि श्वसनविकारांचा धोका वाढतो. वृद्ध, लहान मुले, गर्भवती महिला आणि आधीपासून आजार असलेल्या व्यक्तींना सर्वाधिक धोका असतो. तज्ज्ञांच्या मते, शहरांमधील काँक्रीटीकरण, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि हरित क्षेत्रातील घट यामुळे ‘अर्बन हीट आयलंड’ प्रभाव वाढत आहे. त्यामुळे शहरांचे तापमान आसपासच्या ग्रामीण भागांपेक्षा अनेकदा दोन ते पाच अंश सेल्सिअसने अधिक नोंदवले जाते. हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी हरित क्षेत्र वाढवणे, उष्णता कृती आराखडे राबवणे आणि जीवाश्म इंधनांवरील अवलंबित्व कमी करणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

Latest Marathi News Live Update : आदित्य ठाकरेंचा शेतात लाइट लावून शेतकऱ्यांशी संवाद

Dharashiv News : आदित्य ठाकरे, अंबादास दानवे यांनी धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा केला पाहणी दौरा; शेतकऱ्यांनी अत्यंत पोटतिडकीने आपल्या व्यथा मांडल्या

Police Commissioner Amitesh Kumar : ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई; वेळेपेक्षा भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य

Karad Ganpati Visarjan : कऱ्हाडच्या मिरवणुकीत दिसली बदलाची चाहूल; डीजेच्या दणदणाटापेक्षा वाद्यांचा गजर, गुलालएेवजी खुलला भक्तीचा रंग

SCROLL FOR NEXT