रिसोड कृषी महाविद्यालयाची
कृषी विज्ञान केंद्राला अभ्यासभेट
--------------------------
रिसोड ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी कृषी विज्ञान केंद्र, करडा येथे अभ्यासभेट दिली. या भेटीचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष अप्तुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपप्राचार्य तथा रावे कार्यक्रमाधिकारी डॉ.परमेश्वर देवडे यांनी भेटीचे समन्वयक म्हणून काम पाहिले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ राजेश डवरे यांनी विद्यार्थ्यांना केंद्राची कार्यपद्धती, विविध उपक्रम तसेच प्रक्षेत्रावरील जैविक कीड व्यवस्थापन प्रयोगशाळेसह विविध प्रात्यक्षिक केंद्रांची माहिती दिली. गृहविज्ञान शाखेच्या प्रमुख शुभांगी वाटाणे यांनी सोया प्रक्रिया केंद्रात सोयाबीनपासून सोया मिल्क व सोया टोफू तयार करण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखविले.
प्रक्षेत्र व्यवस्थापक प्रमोद देशमुख यांनी प्रक्षेत्रावरील विविध पिके, फळपिकांचे पीकसंग्रहालय आणि आदर्श सेंद्रिय प्रक्षेत्राची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष माहिती दिली. केंद्रातील एस. के. देशमुख, तुषार देशमुख, मयूर देशमुख यांच्यासह इतर तज्ज्ञांनी सोया प्रक्रिया केंद्र, माती परीक्षण प्रयोगशाळा आणि पशुपालन केंद्राच्या कार्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
भेटीच्या समारोपावेळी कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे यांनी केंद्रामार्फत शेतकरी हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती सादरीकरणातून दिली. दुर्गेश राऊत यांनी यावेळी सूत्रसंचालन आणि डॉ. परमेश्वर देवडे यांनी आभार मानले.
फोटो
रिसोड, जि. वाशीम ः कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन माहिती घेताना विद्यार्थी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.