रिवाज ज्वेलरी कलेक्शनला
ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जे. के. देवी अँड सन्सलाच प्रथम पसंती
सातारा : सुवर्णसेवेची १०० वर्षांची समृद्ध परंपरा जपणाऱ्या जे. के. देवी अँड सन्स ज्वेलर्सतर्फे ग्राहकांसाठी आयोजित केलेल्या रिवाज फेस्टिव्हलला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पारंपरिक सौंदर्य आणि आधुनिक कलाकुसरीचा संगम असलेले विशेष ‘रिवाज ज्वेलरी कलेक्शन’ला ग्राहक प्रथम पसंती देत आहेत.
महाराष्ट्रीय संस्कृतीतील पारंपरिक दागिन्यांना आधुनिक डिझाइनची जोड देत साकारलेल्या या कलेक्शनमध्ये विविध प्रकारच्या आकर्षक दागिन्यांचा समावेश आहे. सण-समारंभ, लग्नसोहळे आणि खास प्रसंगांसाठी हे दागिने ग्राहकांना एक अनोखा आणि देखणा अनुभव देतील. महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर ४० टक्क्यांपर्यंत, तर डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेसवर ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यात येत आहे, तसेच १.५ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या दागिन्यांच्या खरेदीवर आकर्षक भेट देण्यात येणार आहे. ही सुवर्णसंधी २२ नोव्हेंबर २०२६ पर्यंत उपलब्ध असून, ग्राहकांनी सातारा येथील पंचमुखी गणेश मंदिराशेजारी जे. के. देवी ॲण्ड सन्स ज्वेलर्सला भेट देऊन खास रिवाज ज्वेलरी कलेक्शनचा अनुभव घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
फोटो : PNE26W64816
सातारा : जे. के. देवी ॲण्ड सन्समध्ये रिवाज फेस्टिव्हलला मिळत असलेला ग्राहकांचा प्रतिसाद.
..............................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.