पुणे

नदीपात्रातील वाहतूक आज रात्रीपासून बंद

सकाळवृत्तसेवा

पुणे - मेट्रो खांबांची उभारणी व तांत्रिक दुरुस्तीसाठी नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी शुक्रवारी (ता. ८) रात्री ८ वाजल्यापासून तीन दिवसांसाठी बंद राहणार आहे. सोमवारी (ता. ११) सकाळी सातला रस्ता खुला होण्याची शक्‍यता आहे. वनाज- रामवाडी मेट्रो मार्गासाठी नदीपात्रात खांब उभारण्यासाठी हा बदल केला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे. 

नदीपात्रात ५९ खांब उभारायचे आहे. त्यातील ५८ खांब उभारण्यात आले आहे. आता एक खांब सावरकर स्मारकाच्या मागे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महामेट्रोचे अधिकारी रात्रंदिवस काम करणार आहेत. या बदलाची माहिती नागरिकांना व्हावी, यासाठी फलकही लावण्यात आले आहेत. तसेच रजपूत झोपडपट्टी ते बाबा भिडे पुलावरील वाहतूक बंद राहणार आहे. त्या बदलाची नोंद घेऊन नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. 

कर्वे रस्त्यावर मेट्रो मार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे केलेल्या बॅरिकेडिंगमुळे परिसरात दररोज कोंडी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आता नदीपात्रातील रस्ता बंद राहणार आहे. शनिवार- रविवारी हे सुटीचे दिवस निवडून खांब उभारण्याचे नियोजन केले आहे, असे महामेट्रोचे प्रकल्प व्यवस्थापक अतुल गाडगीळ यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Fact Check: धर्मांतर करा असे सांगणारा कन्हैय्या कुमार यांचा फेक व्हिडीओ पुन्हा व्हायरल; वाचा काय आहे सत्य

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT