riya pawar sing american nation anthem pm modi appreciation pune sakal
पुणे

PM Modi US Visit : रियाच्या आवाजाने अमेरिकन भारतीय मंत्रमुग्ध; पंतप्रधान मोदींनी केले रियाचे टाळ्या वाजवून अभिनंदन

भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षणाचे धडे ही गिरवत असून बॉलीवूड आणि वेस्टर्न संगीतामध्ये रस

राजकुमार थोरात

वालचंदनगर : पुण्यातील पवार कुंटूबातील १६ वर्षाच्या रिया राहुल पवार हिने अमेरिकेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमामध्ये अमेरिकेचे राष्ट्रगीत सादर करुन अमेरिकेतील अनिवासीय भारतीयांना मंत्रमुग्ध केले.पंतप्रधान मोदी यांनीही रिया चे टाळ्या वाजवून कौतुक करुन आपकी आवाज बहुत अच्ची है...असल्याचे सांगितले.

पुण्यातील रास्तापेठमधील श्रद्धा राहुल पवार-भोसले व राहुल सुरेश पवार हे अमेरिकेमध्ये स्थायिक असून सध्या अमेरिकेतील न्यू जर्सीमध्ये राहतात. रिया पवार ही वालचंदनगरच्या मंगल विठ्ठल भोसले यांची नात आहे. १६ वर्षाची रियाला आवाज सुंदर असून तिला गाण्याची आवड आहे. तिला भारतीय शास्त्रीय संगीताचे शिक्षणाचे धडे ही गिरवत असून बॉलीवूड आणि वेस्टर्न संगीतामध्ये रस आहे. वॉशिंग्टन डी.सी. मधील रोनाल्ड रीगन मध्ये अनिवासीय आणि भारतीय वंशज (इंडियन डायस्पोरा) यांच्या कार्यक्रम पार पडला. मोदी व्यासपीठावरती येताच भारत माता की जय...

वंदे मात् रम च्या घोषणेने हॉल दणादणला होता. सुरवातील भारताचे राष्ट्रगित झाल्यानंतर रिया पवार हिला अमेरिकेचे राष्ट्रगीत सादर करण्याची संधी मिळाली . रियाच्या आवाजाने अमेरिकेतील भारतीय नागरिक व पंतप्रधान नरेंद मोदी ही मंत्रमुग्ध झाले. मोदींनी राष्ट्रगीत झाल्यानंतर रियाचे टाळ्या वाजवून कौतुक केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून खूप आनंद झाला. त्यांच्या समोर राष्ट्रगीत सादर करण्याची संधी मिळाली याचा अभिमान आहे. त्यांनी दिलेले आशीर्वाद प्रेरणादायी असल्याचे रिया राहुल पवार यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीसमोर रिया ने सादर केलेले राष्ट्रगिताचा प्रसंग अभुतपूर्व होता.आमचे डोळे आनंदअश्रुंनी भरुन आले होते. मोदींनी अमेरिकेसोबत केलेले डिफेन्स व इतर करारामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा उंचावली आहे. तसेच गुगलच्या नवीन करारामुळे भारतीय विद्यार्थ्यांचा फायदा होणार असून वेगवेगळ्या भाषेत शिक्षणाचे धडे गिरवता येणार असल्याचे रिया ची आई श्रद्ध पवार-भोसले व वडिल राहुल पवार यांनी सकाळची बोलताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI चा मोठा निर्णय! एकदिवसीय क्रिकेटला नवा आकार; प्लेट ग्रुप सिस्टीम लागू, नेमका बदल काय होणार?

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

Raj Thackeray in Pune :राज ठाकरेंनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र!

Mangalwedha News : वाचन संस्कृती टिकवण्यासाठी प्राथमिक शिक्षकाची परभणी-कोल्हापूर सायकल यात्रा

Donald Trump: देशात आता 'स्वदेशी जागरण अभियान'; भाजपचा पुढाकार, 'ट्रम्प टॅरिफ'ला देणार उत्तर

SCROLL FOR NEXT